24.6 C
Latur
Sunday, December 1, 2024
Homeमनोरंजन‘गोट’ची बॉक्स ऑफिसवर हवा

‘गोट’ची बॉक्स ऑफिसवर हवा

पहिल्या दिवशी केली छप्पर फाड कमाई

मुंबई : साऊथचा सुपरस्टार थलपथी विजयच्या ‘गोट’ (द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम)ने रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर चांगलीच हवा निर्माण केली आहे. पहिल्याच दिवशी हा चित्रपट चांगली कमाई करेल अशी अपेक्षा निर्मात्यांना होती, मात्र ‘गोट’ने पहिल्या दिवशी छप्पर फाड कमाई करून निर्मात्यांनाही चकित केले आहे. जोसेफ विजयचा हा चित्रपट २०२४ मधील आतापर्यंतची सर्वांत मोठी ओपनिंग असलेला तमिळ चित्रपट बनला आहे. दरम्यान, विजयच्या चित्रपट कारकीर्दीतील हा त्याचा दुसरा शेवटचा चित्रपट आहे.

साऊथस्टार थलपथी विजयच्या ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम (गोट) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. हा चित्रपट गुरुवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षक आणि समीक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी याने प्रचंड नफा कमावला आणि चित्रपट जगभर हिट झाला. वेंकट प्रभू दिग्दर्शित या चित्रपटात विजय व्यतिरिक्त प्रभू देवा, मोहन, स्नेहा आणि प्रशांत यांच्याही भूमिका आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ‘गोट’ने पहिल्या दिवशी ४३ कोटींची कमाई केली आहे. ‘गोट’ २०२४ मध्ये आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये सर्वांत मोठी ओपनिंग असलेला तमिळ चित्रपट बनला आहे. या चित्रपटाने तमिळ भाषेत ३८.३ कोटी रुपयांची कमाई केली. हिंदीत १.७ कोटी आणि तेलगूमध्ये ३ कोटींची कमाई केली आहे. यासह गोटची पहिल्या दिवसाची कमाई ४३ कोटींवर पोहोचली आहे.

विजयचा ‘थलपथी ६९’ असेल शेवटचा चित्रपट
दरम्यान, हा चित्रपट विजय आणि त्याच्या चाहत्यांसाठी देखील खास आहे कारण यानंतर विजय आणखी एक चित्रपट करणार आहे आणि त्यानंतर अभिनयातून निवृत्ती घेणार आहे. हा त्याचा शेवटचा चित्रपट असल्याचे विजयने आधीच जाहीर केले होते. यानंतर ते पूर्णपणे राजकारणावर लक्ष केंद्रित करणार आहेत. त्याचा शेवटचा चित्रपट ‘थलपथी ६९’ असेल. जो एच. विनोथ दिग्दर्शित करू शकतात. मात्र, दिग्दर्शकाबाबत अद्याप कोणताही दुजोरा मिळालेला नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR