21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमुख्य बातम्यालष्करी कमांडर्सना युद्धासाठी सदैव सज्ज राहण्याचे निर्देश

लष्करी कमांडर्सना युद्धासाठी सदैव सज्ज राहण्याचे निर्देश

लखनौतील परिषदेत राजनाथ सिंह यांचे विधान

 

लखनौ : वृत्तसंस्था
भारत नेहमीच शांततेचा उपासक राहिला आहे आणि राहील, सध्याची जागतिक परिस्थिती पाहता आपण युद्धासाठी सदैव तयार असले पाहिजे, असे मी लष्कराच्या कमांडर्सना सांगितले, असल्याचे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ स्ािंह म्हणाले. आज राजनाथ सिंह यांनी माध्यमांसोबत बोलताना ही प्रतिक्रिया दिली.

केवळ भारताने ‘वसुधैव कुटुंबकम्’चा संदेश दिला. भारताने नेहमीच शांततेचा पुरस्कार केला आहे. भारत नेहमीच शांतीचा उपासक आहे, होता आणि राहील, असेही ते म्हणाले.

यावेळी सिंह यांनी रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास संघर्ष आणि बांगलादेशातील सद्यस्थितीचा उल्लेख केला. त्यांनी कमांडर्सना या घटनांचे विश्लेषण करण्यासाठी, भविष्यात देशाला भेडसावणा-या समस्यांचा अंदाज घ्या आणि सामोरे जाण्यासाठी तयार रहा. उत्तरेकडील सीमेवरील परिस्थिती आणि शेजारील देशांमधील घडामोडी लक्षात घेऊन सर्वोच्च लष्करी नेतृत्वाने सर्वसमावेशक आणि सखोल विश्लेषण करण्याची गरज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली.

राजनाथ सिंह यांनी डेटा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर देण्याचे आवाहनही लष्करी नेतृत्वाला केले. हे घटक कोणत्याही संघर्षात किंवा युद्धात प्रत्यक्ष सहभागी होत नाहीत. त्यांचा अप्रत्यक्ष सहभाग युद्धाचा मार्ग ठरवत असतो, असंही राजनाथ सिंह म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR