27.9 C
Latur
Tuesday, May 13, 2025
Homeलातूरविद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारावा : बावगे

विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारावा : बावगे

लातूर : मानव जीवन विकास प्रतिष्ठान स्वप्नभूमी काटगाव द्वारा संचलित साने गुरुजी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा काटगाव तालुका जिल्हा लातूर या ठिकाणी आज विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनात या नैतिक मुल्याचा प्रचार प्रसार व्हावा व विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारावा या उद्देशाने शाळेमध्ये महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे यांच्या उपस्थितीमध्ये प्रात्यक्षिकासह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी संस्थेचे संस्थापक सचिव शेषेराव चव्हाण, रोहित चव्हाण उपस्थित होते. बावगे यांनी आपण अंधश्रद्धेच्या बळी कसे पडतो, आपण अनेक भोंदू बाबांच्या चमत्काराला कसे बळी पडतो. हे प्रात्यक्षिकासह त्या ठिकाणी त्यांनी दाखवले व तसेच केलेल्या प्रत्येक प्रात्यक्षिकाची उकल करून त्यांनी या ठिकाणी सांगितले. यातून विद्यार्थ्यांना प्रत्येक घटनेमागील चिकित्सक तर्कशुद्ध विचार करण्याची कशी गरज आहे हे पटवून देण्यात आले अतिशय दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन याप्रसंगी करण्यात आले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR