मुंबई : प्रत्नििधी
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांनी रिलायन्स फाऊंडेशनच्या वतीने २० किलो सोन्याचा मुकुट लालबागच्या राजाला चढवला आहे. यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी लालबागच्या राजाच्या मूर्तीचे नुकतेच अनावरण करण्यात आले. त्यावेळी हा मुकुट चढवण्यात आला आहे. याबाबत सध्या चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे.
मुंबईतील सुप्रसिद्ध लालबागच्या राजाची बहुप्रतीक्षित मूर्तीची पहिली झलक नुकतीच पाहायला मिळाली आहे. अशातच गणेशोत्सवातील विशेष बाब म्हणजे यावेळी लालबागच्या राजासाठी अंबानी कुटुंबाने तब्बल २० किलोचा सोन्याचा मुकुट दान केला आहे. या सोन्याच्या मुकुटाची किंमत तब्बल १५ कोटी रुपये इतकी आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात सोने वापरून तयार केलेला मुकुट लालबागच्या राजाला चढवण्यात आला आहे. त्यामुळे याबाबत सध्या चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे.
मुंबईतील सुप्रसिद्ध लालबागच्या राजाच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांनी रिलायन्स फाऊंडेशनच्या वतीने हा २० किलोचा सोन्याचा मुकुट लालबागच्या राजाला चढवला आहे. मुकेश अंबानी आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब मागील काही काळापासून लालबागच्या राजाच्या मंडळासोबत जोडले गेले आहे. विशेष म्हणजे अंबानी परिवार हा लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत देखील सहभागी होत असतो.
याबाबत बोलताना लालबागचा राजा मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी सांगितले आहे की, लालबागच्या राजाच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले असून, अंबानी कुटुंबाने तब्बल २० किलो सोन्याचा मुकुट बाप्पाला दान केला आहे. अंबानी कुटुंबाकडून हा मुकुट मंडळाकडे देण्यात आला असून, हा मुकुट लालबागच्या राजाला चढवण्यात आला आहे. अंबानी कुटुंब हे अनेक वर्षांपासून, लालबागचा राजा मंडळासोबत जोडले गेले आहे.