मुंबई : प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवस मुंबई दौ-यावर आहेत. त्यामुळे महायुतीच्या गोटात विविध राजकीय बैठका, चर्चा होताना दिसत आहेत.
आता नुकतंच अमित शाह यांची भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे एक बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. या बैठकीला अमित शाहांनी सर्व नेत्यांना अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर येऊ नये म्हणून जाहीर वाद करणे टाळा, अशी महत्त्वाची सूचना अमित शाहांनी यावेळी दिली.
अमित शाह यांची महायुतीतील महत्त्वाच्या नेत्यांसह भाजप नेत्यांसोबत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अमित शाह यांनी महायुतीतील नेत्यांना चांगलेच खडसावले. तसेच त्यांना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही सूचनाही केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीतील चुका विधानसभेत करणे टाळा, अशी सूचना अमित शाह यांनी केली.
महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर येऊ नये म्हणून जाहीर वाद करणे टाळा , असेही अमित शाहांनी यावेळी सांगितले. महायुतीतील नेत्यांनी संयम ठेवावा. महायुतीने एकजूट असल्याचे चित्र जनतेसमोर जाईल, याची काळजी घ्यावी. लोकसभा निवडणुकीतील चुका विधानसभा निवडणुकीत टाळा. लोकसभेचा फटका विधानसभेत नको. नेत्यांनी संयम ठेवावा, जाहीर वाद करु नका , अशा महत्त्वाच्या सूचना अमित शाह यांनी दिल्या.