उल्हासनगर : प्रतिनिधी
उल्हासनगर कॅम्प ४ मधील बिस्किट कंपनीला आज आग लागली. गावदेवी मंदिराजवळील औद्योगिक परिसरात असलेल्या दलसन फूड कंपनीला ही आग लागली असून, आगीत कंपनीचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या असून, आगिवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.
मुख्य अग्निशमन अधिकारी सुरेश बोंबे यांनी सांगितले की, ही आग सकाळी ८.१५ च्या सुमारास लागली. आगीच्या घटनेदरम्यान आपत्कालीन सेवांनी तातडीने प्रतिसाद दिला. यानंतर दोन अग्निशमन दल घटनास्थळी रवाना झाले. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. प्राथमिक माहितीनुसार, ही आग विद्युत यंत्रणेतील शॉर्टसर्किटमुळे लागली आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे बोंबे यांनी सांगितले.