27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रखोके सरकार महाराष्ट्राचे की गुजरातचे

खोके सरकार महाराष्ट्राचे की गुजरातचे

खेड : राज्यातील खोके सरकार हे महाराष्ट्राचे की, गुजरातचे आहे हे कळेनासे झाले आहे. ज्याप्रमाणे गद्दार सुरतमार्गे जाऊन आले त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जात आहेत.
येत्या डिसेंबरमध्ये होणारे हिवाळी अधिवेशन हे या खोके सरकारचे शेवटचे अधिवेशन असून, हे ४० गद्दार पुन्हा विधानसभेत दिसणार नसल्याचा घणाघात युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला.

खेड येथील माजी आमदार संजय कदम यांच्या घराजवळील अंगणात आयोजित केलेल्या खळा बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘शिवसेना हा एक परिवार आहे. त्यामुळे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधावा म्हणून ही बैठक आहे. राज्यातील उद्योग गुजरातला जात आहेत. चिपी विमानतळ सुरू करण्यापासून अनेक मंदिरांना फंड देणे असेल, ही कामे थांबली आहेत. प्रत्येक क्षेत्रात हे सरकार अपयशी ठरले आहे. कृषिक्षेत्र तर पूर्ण कोलमडलेले आहे

. हे वातावरण जर बदलायचे असेल तर याला एकच पर्याय आहे. निवडणूक जिंकण्याशिवाय पर्याय नाही. ३१ डिसेंबरच्या आधी कोर्टाने निर्णय देणे गरजेचे आहे. हे ४० गद्दार पुन्हा विधानसभेत दिसणार नाहीत. विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा, राज्यसभा जिंकणे गरजेचे आहे. मुंबईने साथ दिली आहे. मागील कोकण पदवीधर निवडणुकीत आपली तयारी कमी पडली होती; पण आता संधी आली आहे.

या निवडणुकीत देशातील कुठलाही पदवीधर नावनोंदणी करू शकतो. त्यामुळे नावनोंदणी करून आघाडीला मतदान करून सरकार पाडा.’ यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, भास्कर जाधव, माजी आमदार संजय कदम, माजी खासदार अनंत गीते, युवासेना सचिव वरूण सरदेसाई आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR