28.9 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeअंतरराष्ट्रीयव्हिएतनाममध्ये वादळात आतापर्यंत ६४ लोकांचा मृत्यू

व्हिएतनाममध्ये वादळात आतापर्यंत ६४ लोकांचा मृत्यू

व्हिएतनाम : प्रशांत महासागरात आलेल्या यागी वादळाने सोमवारी व्हिएतनामसह चीन आणि फिलिपीन्समध्ये मोठ्या प्रमाणात हाहाःकार आहे. तर उत्तर व्हिएतनाममधील फू थो प्रांतात फाँग चाऊ पुलाचा भाग नदीत कोसळला आहे. यामुळे अनेक वाहने वाहून गेले आहेत. ७ सप्टेंबर ला हे वादळ धडकले आहे. तर या वादळामुळे आतापर्यंत ६४ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

वादळामुळे वारे ताशी २५० किलोमीटरने वाहत होते. नंतर वादळाचा जोर कमी झाला आणि जोरदार पावसाला सुरवात झाली होती. मासेमारी करण्यासाठी गेलेल्या लोकांचे जहाजे बेपत्ता झाले आहेत तर त्यांचा शोध घेणं सुरू आहे. अनेक भागांमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच शेकडो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

मिळालेल्या अहवालानुसार, कोसळलेला पूल हा ३७५ मीटर लांबीचा होता. हा पूल पडल्यानंतर दुचाकींसह एकूण १० वाहने नदीत पडले आहेत. यातील काही लोकांचा शोध लागला असून अद्याप १३ जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. तर उपपंतप्रधान हो डक फोक यांनी याबाबतची अधिक माहिती दिली आहे. ते म्हणाले की, ”बचाव कार्य सुरूआहे. पुलाचा काही भाग अजूनही शाबूत आहे. तसेच उर्वरित भागाचे बांधकाम केलं जाईल.”

आपत्कालीन मदतीची घोषणा
पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह यांनी आपत्कालीन मदतीची घोषणा केली आहे. लोकांच्या मदतीसाठी सैन्यदलाची मदत घेण्यात आली आहे. वादळामुळे उत्तर व्हिएतनाममधील औद्योगिक क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विजेच्या तारा तुटल्यामुळे वीज सेवा खंडित झाल्यामुळे आणि दूरसंचार सेवा विस्कळीत झाल्यामुळे लाखो लोकांचे नुकसान झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR