22.3 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रअजित पवार हे बारामतीमधूनच निवडणूक लढतील

अजित पवार हे बारामतीमधूनच निवडणूक लढतील

गोंदिया : प्रतिनिधी
अजित पवार यांनी म्हटले होते की ते बारामतीमधून विधानसभेची निवडणूक लढणार नाही, यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, त्यांना आग्रह केल्यानंतर अजित पवार हे बारामतीतूनच निवडणूक लढतील, असे ते म्हणाले. अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या बालेकिल्ल्यामध्ये शरद पवार गटाच्या शिवस्वराज यात्रेचे आगमन झाले होते. त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, बारामतीला एकदा माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळाला पाहिजे. दुसरा आमदार आला की माझी किंमत तुम्हाला कळेल. मीही आता ६५ वर्षांचा झालोय, न मागताही विकासकामे होत आहेत तरीही बारामतीकर वेगळा विचार करतात, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर ते बारामतीमधून निवडणूक लढणार नसल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत का? अशा चर्चांना उधाण आले आहे. आता याच मुद्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर टीका करत मिश्किल टोला लगावला आहे.

अजित पवार यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या दौ-यावर आले असताना मी शरद पवारांना सोडून चूक केली, असे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, अजित पवार हे काय बोलतात त्यासाठी त्यांच्याकडे कन्सल्टंट आहेत आणि कन्सल्टंट हे काय सांगतात त्यानुसार ते बोलत असतात. ते स्वत:च्या बुद्धीने आणि स्वत:च्या इच्छेने बोलत नाहीत. त्यांचे कन्सल्टंट जे सांगतात त्यानुसार ते बोलतात, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR