22.8 C
Latur
Saturday, December 21, 2024
Homeमहाराष्ट्रनीरव मोदीची मालमत्ता जप्त

नीरव मोदीची मालमत्ता जप्त

स्थावर मालमत्ता, बँक ठेवींचा समावेश
मुंबई : प्रतिनिधी
नीरव मोदीने केलेल्या बँक गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) स्थावर मालमत्ता व बँक ठेवी अशा २९ कोटी ७५ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. ६४९८ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे बुधवारी ईडीकडून सांगण्यात आले.

ईडीने नीरव मोदी व त्याच्याशी संबंधित समूहाच्या जमीन, इमारती व बँक ठेवी अशा एकूण २९ कोटी ७५ लाख रुपयांची माहिती घेतली होती. या मालमत्तांवर ईडीने टाच आणली आहे. या प्रकरणात आतापर्यंत स्थावर आणि जंगम अशा एकूण २५९६ कोटींच्या मालमत्तांवर ईडीने टाच आणली आहे.

नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेची सुमारे ६ हजार ४९८.२० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असून तो या प्रकरणात मुख्य आरोपी आहे. केंद्रीय अन्वेषण विभागही (सीबीआय) या प्रकरणी चौकशी करत आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार ६ हजार ४९८.२० कोटी रुपयांच्या पीएनबी बँकेच्या फसवणूक प्रकरणात पीएमएलए कायद्याअंतर्गत ईडीने गुन्हा दाखल होता. नीरव मोदी आणि त्याच्या साथीदारांना फरार घोषित केल्यानंतर आर्थिक गुन्हेगार म्हणून त्याच्या जंगम आणि स्थावर अशा एकूण ६९२ कोटी ९० लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आली होती. तसेच १०५२ कोटी ४२ लाख रुपयांची मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकेला परत करण्यात आली आहे.

नीरव मोदीने वर्षाच्या सुरुवातीला ब्रिटन येथील न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होेता. तो तेथील न्यायालयाने फेटाळला आहे. त्यानंतर नीवर मोदीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सध्या तो ब्रिटनमधील तुरुंगात आहे. या प्रकरणी ईडी अधिक तपास करीत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR