27.7 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeराष्ट्रीयपूजा खेडकरची न्यायालयात देखील खोटी साक्ष

पूजा खेडकरची न्यायालयात देखील खोटी साक्ष

नवी दिल्ली : युपीएससीची बनवाबनवी केलेल्या पूजा खेडकरवर यांच्यावर न्यायालयात आणखी गंभीर आरोप करण्यात आले आहेत. न्यायालयात देखील पूजा खेडकर खोटं बोलत असल्याचे आरोप केंद्रीय लोकसेवा आयोगाने केले आहेत. पूजा खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयात खोटी माहिती दिली असल्याचा युक्तीवाद युपीएससीच्या वकिलांनी केला आहे.

यूपीएससीच्या वकिलांनी पूजा खेडकरवर न्यायालायत गंभीर आरोप केले आहेत. पूजा खेडकर न्यायलयात देखील खोट बोलत असल्याचा आरोप यूपीएससीच्या वकिलांनी केला आहे. पूजा खेडकरनं कोर्टासमोर खोटी माहिती दिली आहे, दिल्ली हायकोर्टात सुनावणी दरम्यान युपीएससीच्या वकीलांनी आरोप केले आहेत.

युपीएससीने ३१ जुलै रोजी पत्रक काढून पूजा खेडकरची उमेदवारी रद्द केली होती. शिवाय भविष्यात कोणतीही परिक्षा देता येणार नसल्याचे ई मेल मधून कळवले होते. परंतु तो ई मेल मिळाला नसल्याचा दावा पूजा खेडकरनं कोर्टात केला होता. यावर येत्या तीन आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे आदेश पूजा खेडकरला हायकोर्टानं दिले आहेत. पुढील सुनावणी २६ नोव्हेंबरला होणार आहे. यूपीएससी तर्फे नरेश कौशिक यांनी युक्तीवाद केला.

पूजा खेडकरनं खोटी साक्ष दिल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. पूजा खेडकरवर युपीएससी परिक्षा पास होण्यासाठी ओबीसी आणि दिव्यांग कोट्यातील आरक्षणाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. खोटी कागदपत्र देत युपीएससीची फसवणूक करणाऱ्या पूजा खेडकरवर कारवाई करण्यात आली आहे. तिला सनदी सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. या प्रकरणात सुप्रीम कोर्टात खटलाही सुरु करण्यात आलाय. दरम्यान युपीएससीने कारवाईचा बडगा उगारत तिच्यावर कारवाई केली आहे. मागील आठवड्यात लोकसेवा आयोगाने पूजा खेडकरची निवड रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यावेळी टेक्निकल अडचणी आल्या होत्या. आता मात्र तिला सेवेतून पडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR