सोलापूर : भारती विद्यापीठ अंतर्गत अभिजीत कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्सेस सोलापुर येथे दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.प्रथेप्रमाणे यावर्षीही इन्स्टिट्यूट मध्ये पर्यावरण पूरक अशा इकोफ्रेंडली गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली होती.
अभिजीत कदम इन्स्टिट्यूट चा कॅम्पस हा ग्रीन कॅम्पस म्हणून ओळखला जातो. इन्स्टिट्यूट मध्ये विविध प्रकारची एक हजारा हुन अधिक झाडे लावण्यात आलेली आहे व यामुळेच इन्स्टिट्यूटच्या परिसरातील तापमान मध्येही घट झाल्याचे लक्षात येते.
पर्यावरणाच्या संगोपनासाठी इन्स्टिट्यूट तर्फे विविध उपाय योजना केल्या जातात व त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थी तसेच समाजामध्ये पर्यावरण संवर्धनासाठी संदेश जावा म्हणून इको फ्रेंडली गणपतीची स्थापना करण्यात येते. पारंपरिक वाद्यांचा वापर करून इन्स्टिट्यूटच्या परिसरातच बाप्पाची शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली व कुंडीमध्ये या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.
दुसऱ्या दिवशी या कुंडीतच रोप लावून पर्यावरण संगोपनाचा संदेश देण्यात आला. यावेळी इन्स्टिट्यूट चे संचालक प्रा. डॉ.एस.बी. सावंत खूप उपप्राचार्य डॉ. पी. पी. कोठारी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.