19.9 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रसत्ताधा-यांना सत्तेचा उन्माद, निवडणुकीत जागा दाखवू

सत्ताधा-यांना सत्तेचा उन्माद, निवडणुकीत जागा दाखवू

धुळे : प्रतिनिधी
सत्तेचा माज या लोकांच्या डोक्यात शिरला आहे. त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे. बाबासाहेबांनी लोकशाहीचा अधिकार आपणास दिला आहे. परंतु या लोकांना सत्तेचा उन्माद चढला आहे. त्यांना आता खड्यासारखे बाजूला काढा. या निवडणुकीत ती संधी तुम्हाला आहे, असे शरद पवार यांनी म्हटले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार धुळ्यातील सिंदखेडा येथील शेतकरी मेळाव्यात बोलत होते.
या मेळाव्यातून त्यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या शेती धोरणावर जोरदार हल्ला केला. आपण दहा वर्षे कृषि विभागाचे काम करत होतो, तेव्हा देश अन्नधान्यासंदर्भात स्वयंपूर्ण झाल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
पुढे बोलताना, सत्तेचा माज या लोकांच्या डोक्यात शिरला आहे. त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे. बाबासाहेबांनी लोकशाहीचा अधिकार आपणास दिला आहे. परंतु या लोकांना सत्तेचा उन्माद चढला आहे. त्यांना आता खड्यासारखे बाजूला काढा. या निवडणुकीत ती संधी तुम्हाला आहे.

पुढे बोलतान पवार म्हणाले की, आजच्या राज्यकर्त्यांना शेतीची आस्था नाही. त्यांच्याकडून शेतीसंदर्भात धोरणे राबवली जात नाहीत. कांद्यासंदर्भातील उदाहरण समोर आहे. मोदी सरकारने त्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली होती. कांद्याला भाव मिळाला नव्हता. कांदा उत्पादक शेतक-यांनी कष्टाने कांद्याचे पीक घेतले. त्यानंतर निर्यात बंदी करण्यात आली. गहू, तांदळावर बंदी घातली.

जे, जे तुम्ही पिकवता त्यावर निर्यात बंदी केली. मोदी सरकार शेतक-यांच्या विरोधात आहे. दहा वर्षे मी शेतीचे जे काम केले त्यामुळे जगात सर्वाधिक तांदूळ पिकवणारा देशात भारत पहिल्या क्रमांकावर पोहोचला.

बहिणींचा सन्मान राखला जावा
शरद पवार म्हणाले, आता गुंडगिरीचे राज्य सुरु झाले आहे. हे सरकार बहिणींना १५०० हजार रुपये देणार आहे. पण बहिणींची अब्रू वाचविण्याची गरज आहे. बहिणींचा सन्मान राखला जावा, त्याकडे सरकारचे लक्ष नाही, असा जोरदार टोला लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारवर शरद पवार यांनी लगावला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR