निलंगा : प्रतिनिधी
संयुक्त कुटुंब संस्कृती लुप्त होत असताना विद्यार्थ्यांना आजी-आजोबांचे मार्गदर्शन मिळावे व संस्कृतीचा ठेवा जतन व्हावा म्हणून औराद शहाजानी (ता निलंगा) येथील युनिव्हर्सल पब्लिक स्कूलमध्ये आजी-आजोबा दिन साजरा करण्यात आला. यादिनानिमित्त नातवंडांनी आपल्या आजी आजोबांचे पाय धुवून औक्षण केले व गप्पागोष्टी करीत आजी आजोबा दिनाचा आनंद घेतला.
यावेळी आदर्श शेतकरी सुभाष मुळे, सौ.गंगाबाई मुळे, प्रकाश कुलकर्णी, सौ.जयश्री कुलकर्णी हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात माझा बप्पा किती गोड दिसतो या नृत्यगीत यामधून स्वागत केले. तदनंतर एलकेजी युकेजीचे विद्यार्थी काळे सार्थक, जाधव सानवी, जाधव देवांश, मुल्ला अनया, जाधव आरती, आमले अनुष्का, मदरसे अमित, कोल्हे आयुष, लाड शिवम, सगरे अथर्व, उगले तेजस, पवार आरोही, जगताप रितीका, पाटील ईश्वरी, जोशी वैदेही, बसुदे मार्तंड ,हुगे अर्णव, जोशी श्रीनिधी, आवले पृथ्वीराज, मुळे ंिहदवी या गाण्यावर नृत्य सदर केले.
तसेच वाघमारे विराट, रोडे चेतन, स्वरा कुलकर्णी, श्रुती निरामनाळे, मेघना जावळे, अरहान बिलाल, गाढे इश्वरी आदींनी एक प्यार का नगमा है हे गीत सादर केले तर पाटील शुभम, थेटे सारंग, पाटील प्रणव, थेटे विष्णू, बिरादार प्रांजली यांनी जैसी करणी वैसी भरणे हे नाटक सादर केले. नंतर पवार तनिष्का, पवार आरोही, पांडे स्रेहा, धबाले सानवे, कलगने श्रावणी, सूर्यवंशी स्वराली, यादव स्रेहल, अंचुळे अहिल्या, गणपुरे भक्ती, आगरे अन्वी, सावरे आनंद, शेळके अर्णव, पवार प्रीतम, चिलमे सार्थक, सौदागर जयंत, पांचाळ व्यंकटेश, सगरे आदिती, बिरादार किरण, आग्रे रामेश्वर आदींनी तेरा मुझसे पहिले का नाता कोई या गाण्यावर नृत्य केले. या नृत्याला अश्विनी शहापुरे यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी आजी आजोबा यांचे त्याच्या नातवंडांकडून पाय धुवून, ओवाळणी करून व स्वत: बनविलेल्या भेटवस्तू देण्यात आल्या तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश कुलकर्णी यांनी सर्व विद्यार्थ्यांना आजी-आजोबा दिवस का साजरे करतात आणि आज-काल ते का महत्त्वाचे आहे याची माहिती सांगितली. सूत्रसंचलन शिट्टी दीक्षा, सोनटक्के गजानन, गोपने अनुराग, भंडारे आशिष यांनी तर आभार श्रुती कुलकर्णी यांनी मानले.