24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रबाप्पाचा मोदक २ लाख २२ हजारांना!

बाप्पाचा मोदक २ लाख २२ हजारांना!

अंबरनाथ : प्रतिनिधी
गणेशोत्सव नुकताच पार पडला असून गणपती बाप्पाला मोदकांचा प्रसाद दिला जात असतो. अशाच प्रकारे अंबरनाथमध्ये गणपती बाप्पासमोरील दिलेल्या मोदक प्रसादाचा तब्बल २ लाख २२ हजार रुपयांना लिलाव करण्यात आला.

अंबरनाथमधील खाटूश्याम मित्रमंडळाकडून करण्यात आलेल्या या लिलावात अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या पत्नी डॉ. शिल्पा किणीकर यांनी ही सर्वाधिक बोली लावत हा मोदक खरेदी केला.

अंबरनाथमधील खाटूश्याम मित्रमंडळाकडून बाप्पासमोर ठेवलेल्या महामोदकाचा विसर्जनाच्या दिवशी लिलाव करण्याची प्रथा आहे. साधारण मागील १५ वर्षांपासून ही परंपरा मंडळाकडून सुरू आहे. या लिलावात आज ६७ हजार रुपयांपासून बोली सुरू करण्यात आली. यावेळी अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या कुटुंबीयांनी देखील लिलावात सहभागी होत बोली लावली आणि सर्वाधिक २ लाख २२ हजार रुपयांची बोली लावत हा मोदक खरेदी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR