19.3 C
Latur
Saturday, November 9, 2024
Homeपरभणीमराठा आरक्षणासाठी पाचेगाव येथील तरुणाची आत्महत्या

मराठा आरक्षणासाठी पाचेगाव येथील तरुणाची आत्महत्या

जिंतूर : मराठा आरक्षण मिळावे यासाठी मागील एक वर्षापासून संपूर्ण राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. सरकारने सगेसोयरे अधिसूचना अमलात आणली जात नसल्यामुळे व संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणास बसत असल्याने सरकारच्या विरोधात संतापाचे वातावरण आहे. जिंतूर तालुक्यातील पाचेगाव येथील २७ वर्षीय तरुणाने चिट्ठी लिहून मराठा आरक्षण मिळत नसल्याने शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.१६ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजता उघडकीस आली असून तालुक्यातील पाचवा बळी ठरला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिंतूर तालुक्यातील पाचेगाव येथील किशोर ससे (वय २७) हा तरुण मागील वर्षांपासून मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभाग होता. विशेष करून जिंतूर तालुक्यातील मराठा आरक्षण आंदोलनात पाचेगाव अग्रस्थानी आहे. यातच दि.१६ सप्टेंबर पासून संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसत असल्यामुळे ससे चिंताग्रस्त होते. यातूनच त्याने स्वत:च्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

नातेवाईकांनी घटनेची माहिती देताच पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन झाडाला लटकलेल्या अवस्थेतून काढून तरूणाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दरम्यान ससे यांनी आत्महत्येपूर्वी हातावर लिहून व एक मराठा कोटी मराठा असे चिठ्ठीवर लिहलेले आढळून आले. या चिठ्ठीत मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यामुळे आत्महत्या करत आहे. यामध्ये माज्या आई वडील पत्नी भाऊ यांचा संबंध नाही असा मजकूर आहे. या घटनेची नोंद जिंतूर पोलिसांत करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR