मुंबई : प्रतिनिधी
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पुन्हा एकदा भाजप आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातल्या आणि देशाच्या जनतेचे अभिनंदन केले पाहिजे कारण ज्यावेळेस देशाची लोकशाही धोक्यात आली होती तेव्हा भाजपला धडा शिकवण्याचे काम देशाच्या जनतेने केले असा हल्लाबोल थोरात यांनी केला आहे.
महाराष्ट्रातल्या आणि देशाच्या जनतेचे अभिनंदन केले पाहिजे, कारण ज्यावेळेस देशाची लोकशाही धोक्यात आली होती तेव्हा भाजपला धडा शिकवण्याचे काम देशाच्या जनतेने केले. तरी विषय संपलेला नाही. जोपर्यंत भाजप आहे, आरएसएस आहे तोपर्यंत देशाला आणि लोकशाहीला धोका आहे लक्षात ठेवा. तुम्ही मुंबईच्या जवळ राहता. तुम्हाला सर्व परिस्थिती माहिती आहे. कुर्ला आणि वरळी डेअरीच्या जमिनीचा कसा व्यवहार सुरू आहे ते बघा. मंत्रालय हे भ्रष्टाचाराचा केंद्रबिंदू बनलेले आहे, असा हल्लाबोल थोरात यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नाही, लोकांवर गाड्या घालण्याचे काम सुरू आहे. महायुतीतील नेत्यांना सत्तेचा अहंकार झालेला आहे, या सरकारला घालवण्याची जबाबदारी आता तुमची आहे. सरकार कसं बनलंय ते पाहा, जी पद्धत होती ती चुकीची आहे.
कोकण विभागात आपल्याला खूप काम करायला लागणार आहे. आपल्याला जास्त जागा कशा मिळतील ते पहायचे आहे. या निवडणुकीत काही तिकिटं आपल्याला मिळतील, काही मित्रांना मिळतील, लोकांना संदेश सांगायचा त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील. मे महिन्यात पालिकेच्या निवडणुका होतील, असे थोरात यांनी म्हटले आहे.