23 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रचाकणकर-रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली

चाकणकर-रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली

जळगाव : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यात जुंपल्याचे दिसून येत आहे.

रूपाली चाकणकर यांना आमदारकीचे डोहाळे लागले असून त्यांनी आधी नगरसेवक होऊन दाखवावे, अशी टीका रोहिणी खडसे यांनी केली होती. यावर स्वत:चे कर्तृत्व नसताना वडिलांच्या नावावर पद मिळवले, त्यांना टीका करण्याचा अधिकार नसल्याचा पलटवार रूपाली चाकणकर यांनी केला होता. यानंतर आता पुन्हा एकदा दोन्ही महिला नेत्यांमध्ये जुंपल्याचे दिसून येत आहे.

रूपाली चाकणकर यांनी मुक्ताईनगरमधील आयोजित कार्यक्रमात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या माणसाला दीड हजाराची किंमत कशी कळणार? असा प्रश्न उपस्थित करत आम्ही आंदोलनातून मोठे झालेलो आहोत. आमच्या वडिलांनी आमच्यासाठी कुठलाही मतदारसंघात ठेवला नसल्याचे म्हणत रूपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसेंवर हल्लाबोल केला आहे.

दीड हजार रुपयांत काय येतं? असा प्रश्न रोहिणी खडसे यांनी उपस्थित केला होता. त्यावरून रूपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसेंवर हल्लाबोल केला आहे. स्वत:चे कर्तृत्व नसताना वडिलांच्या नावावर सुरक्षित असलेला मतदारसंघही त्यांना जिंकता आला नाही, त्यांनी बोलू नये, असा घणाघातही रूपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसेंवर केला आहे.

रोहिणी खडसेंचा पलटवार
तर रूपाली चाकणकर या बाप बदलवणा-यापैकी आहेत. त्यांनी बाप बदलवले असून त्यांना जनाधार नाही, अशा लोकांच्या वक्तव्याला आपण महत्त्व देत नसल्याचे प्रत्युत्तर रोहिणी खडसेंनी रूपाली चाकणकरांना दिले आहे. आता रूपाली चाकणकर या टीकेवर काय पलटवार करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR