21.2 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्ररोहित पवारांसारखा शिक्षणमंत्री मिळाल्यास मुलांचे भविष्य उज्ज्वल

रोहित पवारांसारखा शिक्षणमंत्री मिळाल्यास मुलांचे भविष्य उज्ज्वल

‘आप’च्या मनिष सिसोदियांकडून तोंडभरुन कौतुक

मिरजगाव : शुक्रवार दि. २० सप्टेंबर रोजी मिरजगाव येथील नवीन जिल्हा परिषद शाळेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, आपचे नेते मनिष सिसोदिया देखील उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी बोलताना मनिष सिसोदिया यांनी भाजपसह केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. बिलियन डॉलर किंवा ट्रिलीयन डॉलर बद्दल कोणी बोलत असेल पण शिक्षणाबद्दल बोलत नसेल हे गृहीत धरा की ते तुम्हाला वेड्यात काढत आहेत.
त्याचबरोबर यावेळी सिसोदियांनी म्हटले जर या मुलांना चांगले शिक्षण देता येत नसेल तर जुमले बांधूनच मतदान मागत असतील असा हल्लाबोल त्यांनी सत्ताधा-यांवर केला आहे. तर या कार्यक्रमावेळी त्यांनी रोहित पवारांचे तोंडभरून कौतुक केले आहे.

रोहित पवार यांच्यासारखा आमदार तुम्हाला मिळाला हे तुमचे सौभाग्य आहे, कोणता आमदार शिक्षणासाठी कोणी प्रयत्न करत नाही, रोहित पवार पुर्ण ताकतीने शिक्षणासाठी प्रयत्न करताना दिसत आहे, ते आताच इतका प्रयत्न करतात तर विचार करा रोहित पवारांसारखा शिक्षणमंत्री महाराष्ट्राला मिळाला तर मुलांचे भविष्य उज्ज्वल बनेल, ते शिक्षणासाठी किती काम करतील. या आमदाराला कधी गमावू नको, आमदार रोहित पवार हे खूप कामाचे आहेत, चांगला माणूस आहे, यासाठी नाही तर तुमच्या मुलांचे उज्ज्वल भविष्य हा आमदार घडवू शकतो असेही पुढे मनिष सिसोदिया यांनी म्हटले आहे.

रोहित पवार संपूर्ण महाराष्ट्राच्या मुलांच्या शिक्षणाचं भविष्य घडवू शकतात. त्यांना राजकारणात प्रोत्साहन द्या. मी देखील एका शिक्षक पेशा असलेल्या कुटुंबातून आलो आहे. उत्तर प्रदेशातील एका गावातून मी आलो, मी पुढे शिक्षण घेऊन दिल्लीत आलो, मंत्री झालो, अरविंद केजरीवालांनी मला शिक्षणमंत्री पदी काम करण्याची संधी दिली. मात्र, राजकारणात अनेकदा शिक्षणाचा मुद्दा उपस्थित होतो तेव्हा तुमचे मनोबल खच्चीकरण करणारे अनेक जण असतात. तुम्हाला मागे खेचणारे, मागे ढकलणारे अनेकजण मिळतात, पण तुम्ही रोहित पवारांचे मनोबल कधी कमी होऊ देऊ नका असेही सिसोदियांनी म्हटले आहे.

सिसोदियांनी रोहित पवारांचे केले कौतुक
रोहित पवारांसारखा शिक्षणमंत्री महाराष्ट्राला मिळाला तर मुलांचे भविष्य उज्ज्वल बनेल. रोहित पवार यांना जनतेने गमावू नये. त्यांच्यासारखा नेता तुम्हाला मिळाला आहे त्यांना गमावू नका. रोहित पवार पुर्ण ताकतीने शिक्षणासाठी प्रयत्न करताना दिसत आहे, ते आताच इतका प्रयत्न करतात तर विचार करा रोहित पवारांसारखा शिक्षणमंत्री महाराष्ट्राला मिळाला तर मुलांचे भविष्य उज्ज्वल बनेल, ते शिक्षणासाठी किती काम करतील. या आमदाराला कधी गमावू नको, आमदार रोहित पवार हे खूप कामाचे आहेत चांगला माणूस आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR