25.4 C
Latur
Thursday, January 2, 2025
Homeमुख्य बातम्यामुस्लीम परिसराचा मिनी पाकिस्तान असा उल्लेख!

मुस्लीम परिसराचा मिनी पाकिस्तान असा उल्लेख!

हायकोर्ट न्यायाधिशाच्या विधानाची गंभीर दखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या टिप्पणीची स्वत:हून दखल घेतली आहे. कर्नाटक हायकोर्टच्या न्यायाधीशांनी बंगळुरू इथं सुनावणीवेळी मुस्लीम वस्त्यांचा मिनी पाकिस्तान असा उल्लेख केला होता. त्यावर सुप्रीम कोर्टाने कर्नाटक हायकोर्टाला उत्तर मागितले आहे.

बार अँड बेंचच्या रिपोर्टनुसार, सरन्यायाधीश चंद्रचूड, न्या. राजीव खन्ना, न्या. बी.आर गवई, न्या. सूर्यकांत आणि न्या. हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने कर्नाटक हायकोर्टच्या रजिस्ट्रार जनरलकडून रिपोर्ट मागितला आहे. कर्नाटक हायकोर्टातील न्या. श्रीशानंद यांनी केलेल्या काही टिप्पणीकडे आमचे लक्ष गेले. त्यानंतर आम्ही एजी आणि एसजी त्यांच्याकडे सल्ला मागितला. आम्ही हायकोर्टच्या रजिस्ट्रार जनरलकडे एक रिपोर्ट मागवला असल्याचं खंडपीठाने सांगितले.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी या प्रकरणाची दखल घेत अ‍ॅटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांना सांगितले की, आम्ही काही मूलभूत मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करू शकतो. सोशल मीडियाच्या या युगात आपल्यावर बारकाईने लक्ष ठेवले जाते आणि आपण त्यानुसार वागले पाहिजे असे सरन्यायाधीशांनी म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR