26.1 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeउद्योग‘एचएएल’ला मिळणार महारत्न कंपनीचा दर्जा

‘एचएएल’ला मिळणार महारत्न कंपनीचा दर्जा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला केंद्र सरकार ‘महारत्न’चा दर्जा देऊ शकते. चांगल्या कामगिरीची अपेक्षा असलेल्या कंपन्यांना सरकार महारत्नाचा दर्जा देते. एचएएल विविध प्रकारची एअरक्राफ्ट्स आणि हेलिकॉप्टर्स तयार करते. भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने ही कंपनी अत्यंत महत्त्वाची आहे. लष्करासाठी लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर तयार करणारी ही एकमेव कंपनी आहे. तेजस लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट, हॉक अ‍ॅडव्हान्सडेट ट्रेनर, डॉर्नियर डीओ-२२८ मल्टीपर्पज लाइट ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट, एसयू-३० एमकेआय यांसारख्या विमानांचा यात समावेश आहे.

५ वर्षात १०४५% परतावा : एचएएलचा शेअर गेल्या वर्षभरात ११६ टक्क्यांनी वधारला आहे. २० सप्टेंबर रोजी बाजार उघडल्यानंतर या शेअरमध्ये तेजी दिसून आली. गेल्या ५ वर्षात या शेअरनं १,०४५% परतावा दिला आहे. यात सरकारच्या धोरणाचा मोठा वाटा आहे. सरकार आयात करण्याऐवजी संरक्षण उपकरणे देशातच तयार करण्यावर भर देत आहे. याचा फायदा ‘एचएएल’ला होत आहे.

१ कोटींपेक्षा अधिकची ऑर्डर : ‘एचएएल’ला नुकताच सरकारकडून मोठी ऑर्डर मिळाली आहे. या अंतर्गत कंपनी एसयू-३० एमकेआय विमानांसाठी २४० एल-३१ एफपी एअरो इंजिन तयार करणार आहे. या ऑर्डरची किंमत सुमारे २६,००० कोटी रुपये आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा महसूल ११ टक्क्यांनी वाढून ४,३५० कोटी रुपये झाला आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीचा नफा ७,६२१ कोटी रुपये होता.
… तर शेअर्समध्ये तेजी : सरकार आपल्या कंपन्यांचे त्यांच्या कामगिरीच्या आधारे मिनीरत्न, नवरत्न आणि महारत्न अशा श्रेणींमध्ये वर्गीकरण करते. सध्या १३ सरकारी कंपन्यांचा महारत्न दर्जा आहे. यामध्ये भेल, बीपीसीएल, कोल इंडिया, गेल, इंडियन ऑइल, ओएनजीसी, पॉवर ग्रिड, सेल, ऑइल इंडिया, आरईसी आणि पीएफसी यांचा समावेश आहे.

महारत्नाचा दर्जा मिळाल्यानंतर कंपनी आपल्या नेटवर्थच्या १५ टक्के रक्कम सरकारच्या परवानगीशिवाय एखाद्या प्रकल्पात गुंतवू शकते. सरकारच्या परवानगीशिवाय ते परदेशात ५००० कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. महारत्नाचा दर्जा मिळाल्यानंतर एचएएलच्या झपाट्यानं वाढीचा मार्ग मोकळा होईल, असा अंदाज आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR