मुंबई : विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्यास अद्याप कालावधी आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांचं जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. त्याआधीच उमेदवार जाहीर करण्यात वंचित बहुजन आघाडीने ‘आघाडी’ घेतली आहे. डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत विधानसभेच्या ११ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये भाजपचे दिग्गज नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. तर रावेरमधून तृतीयपंथी शमिभा पाटील यांना तिकिट देण्यात आले आहे.
नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिला आहे. विनय भांगे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. याशिवाय औरंगाबाद पूर्व येथून भाजपचे अतुल सावे, रावेरमधून काँग्रेसचे शिरीष चौधरी, नांदेड दक्षिण येथून काँग्रेसचे मोहन हंबर्डे, सिंदखेड राजा येथून राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे आमदार असलेल्या जागांवर वंचितने उमेदवार घोषित केले आहेत.
वंचित बहुजन आघाडीची पहिली विधानसभा निवडणूक उमेदवार यादी
रावेर – शमिभा पाटील (तृतीयपंथी)
सिंदखेड राजा – सविता मुंढे
वाशिम – मेघा किरण डोंगरे
धामणगाव रेल्वे – निलेश विश्वकर्मा
नागपूर दक्षिण पश्चिम – विनय भांगे
साकोली – डॉ. अविनाश नन्हे
नांदेड दक्षिण – फारूक अहमद
लोहा – शिवा नारंगळे
औरंगाबाद पूर्व – विकास दांडगे
शेवगाव – किसन चव्हाण
खानापूर – संग्राम माने