22.9 C
Latur
Thursday, November 21, 2024
Homeक्रीडाभारताचा बांगलादेशविरुद्ध दणदणीत विजय

भारताचा बांगलादेशविरुद्ध दणदणीत विजय

पंत, गिल, अश्विन, जडेजा चमकले; मालिकेत आघाडी

चेन्नई : वृत्तसंस्था
भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली आहे. भारतीय संघाने तब्बल २८० धावांनी बांगलादेशचा पराभव केला. या सामन्यात शुभमन गिल, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी चमकदार कामगिरी केली. आता मालिकेतील दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबरपासून कानपूरमध्ये रंगणार आहे.

चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाने बांगलादेशचा २८० धावांनी पराभव केला आहे. भारताने बांगलादेशला ५१५ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ २३४ धावांत गडगडला. रविचंद्रन अश्विनने भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी केली. अश्विनने पहिल्या डावात शतक झळकावले आणि दुस-या डावात ६ विकेट्स पटकावल्या. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे.

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या दुस-या डावात १२४ चेंडूत ऋषभ पंतने आपले शतक पूर्ण केले. तर १२८ चेंडूत १०९ धावा करत ऋषभ पंत बाद झाला. ऋषभ पंतने शतक झळकवल्यानंतर त्याच्यासह संपूर्ण मैदान भावूक झाल्याचे दिसून आले. मैदानात उपस्थित असणा-या प्रेक्षकांपासून रोहित शर्मा, विराट कोहली आणि ड्रेसिंग रूममधील सर्व खेळाडूंनी उभे राहत ऋषभ पंतचे कौतुक केले. ऋषभ पंतने या खेळीत १३ चौकार आणि ४ षटकार टोलवले. ऋषभ पंत शतक झळकवून बाद झाल्यानंतर शुभमन गिलने देखील शतक केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR