छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
लिंबू खाणे हे आरोग्यासाठी अत्यंत चांगले मानले जाते. त्यामुळे अनेकांचे जेवण हे लिंबाशिवाय पूर्ण होत नाही. मात्र, सध्या याच लिंबाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात हॉटेल्स, नाश्ता सेंटर असल्यामुळे लिंबाला मागणी आहे. पण सध्या हे भाव असेच राहतील आणि थोडे दिवस तरी लिंबू खरेदी करणा-या ग्राहकांना ही भाववाढ सहन करावी लागणार आहे.
दरम्यान, सध्या किरकोळ बाजारात लिंबाचे भाव हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये हेच लिंबाचे भाव ६० ते ७० रुपये किलो होते. पण यावर्षी हेच भाव १०० ते २०० रुपये किलोपर्यंत गेले आहेत. सध्या लिंबाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने. ग्राहक आता कमी प्रमाणात लिंबू खरेदी करत आहेत.
सध्या लिंबाचे भाव वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे, मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने लिंबाचे पीक खराब झाल्याने ही भाववाढ झाली आहे. सध्या बाजारात खराब लिंबाचा माल मोठ्या प्रमाणात येत आहे आणि चांगला माल हा कमी प्रमाणात येत असल्यामुळे सध्याला लिंबाचे भाव खूप वाढलेले आहेत. अजून दीड ते दोन महिने लिंबाचे भाव हे असेच राहतील.