19.9 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeअंतरराष्ट्रीयअत्याधुनिक ३१ किलर ड्रोन अमेरिका भारताला पुरविणार

अत्याधुनिक ३१ किलर ड्रोन अमेरिका भारताला पुरविणार

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
भारत आणि अमेरिकेतील संरक्षण व्यापारात सातत्याने वाढ होत आहे. आता भारत अमेरिकेकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज ३१ एमक्यू-९बी (१६ स्काय गार्डियन आणि १५ सी गार्डियन) रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट ड्रोन/किलर ड्रोन खरेदी करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या करारावर स्वाक्षरी केली आहे. या ड्रोनची किंमत सुमारे ३ अब्ज डॉलर्स आहे.

भारतीय संरक्षण मंत्रालयाने गेल्या वर्षी जूनमध्ये अमेरिकेकडून हवेतून जमिनीवर मारा करणा-या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज एमक्यू-९बी स्काय गार्डियन आणि सी गार्डियन सशस्त्र ड्रोन आणि लेझर-गाइडेड बॉम्ब खरेदी करण्यास मंजुरी दिली होती. दरम्यान, आजच्या भेटीत मोदी आणि बायडेन यांनी भारत-अमेरिका संरक्षण सहकार्य रोडमॅपचे कौतुक केले. या रोडमॅप अंतर्गत, जेट इंजिन, दारुगोळा आणि ग्राउंड मोबिलिटी सिस्टीम यांसारखी अवजड उपकरणे आणि शस्त्रे तयार केली जाणार आहेत.

भारत अमेरिकेचा सर्वात मोठा भागीदार
क्वॉड कॉन्फरन्सनंतर दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी भारत-अमेरिका भागीदारी अतिशय मजबूत असल्याचे वर्णन केले. याशिवाय, परस्पर हितसंबंधांच्या क्षेत्रात द्विपक्षीय भागीदारी अधिक दृढ करण्याचे मार्ग, इंडो-पॅसिफिक क्षेत्रासह जागतिक आणि प्रादेशिक समस्या, रशिया-युक्रेन युद्ध आणि मोदींच्या नुकत्याच झालेल्या युक्रेन दौ-यावरही द्विपक्षीय बैठकीत चर्चा झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR