16.2 C
Latur
Tuesday, November 26, 2024
Homeमहाराष्ट्रजरांगेंना काही झाले तर सरकार जबाबदार

जरांगेंना काही झाले तर सरकार जबाबदार

जालना : मनोज जरांगेंना काही झाले तर सरकार जबाबदार असेल, असा इशारा संभाजीराजे यांनी आज सरकारला दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मागच्या सात दिवसांपासून उपोषण करत आहेत.

 

जालन्यातील अंतरवली सराटीत त्यांचे उपोषण सुरु आहे. यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. आज स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवली सराटीमध्ये पोहचले असून, त्यांनी मनोज जरांगेंच्या तब्येतीची चौकशी केली आहे. यावेळी उपोषणस्थळावरून संभाजीराजे यांनी सरकारला इशारा दिला.

मनोज जरांगे पाटील हे सहाव्यांदा आमरण उपोषणाला बसले आहेत. राज्यातील इतिहासातील शरमेची बाब आहे. एक व्यक्ती समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जीवाची बाजी लावायला बसला आहे. त्याची दखल किंबहूना त्यावरचा निर्णय या सरकारने घेतलेला नाही. मी डॉक्टर्सकडून सर्व रिपोर्ट घेतले आहेत. परवा रायगडवर मी गेलो होतो. त्यावेळी मला कळले की मनोज जरांगे यांची तब्येत खालावली आहे. त्यामुळे मी त्यांना पाहण्यासाठी प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो आहे. मनोज जरांगेंचा जीव तुमच्यासाठी आहे. त्यांचा जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी त्यांना पाहायला आलोय. तब्येत खालावली असताना त्यांनी आता सलाईन घ्यायचे बंद केले आहे, याचे मला दु:ख वाटत आहे, जरांगेच्या काही झाले तर त्याची सर्व जबाबदारी ही सरकारची असेल अशा थेट इशारा यावेळी संभाजीराजेंनी सत्ताधा-यांना दिला.

दरम्यान, मी पूवीर्ही जरांगेंसोबत होतो. आजही आहे. उद्याही राहील. आज ब-याच गोष्टी मी बोलू शकतो. पण मला फोकस हलवायचा नाही. मनोज जरांगे यांची तब्येत चांगली असेल तर सर्व गोष्टी करू शकतो. असे ही संभाजीराजे म्हणाले. तसेच जरांगे यांचे ब्लड प्रेशर लो झाले आहे. याचे तुम्हाला जराही गांभीर्य नसेल तर सत्तेत राहून तुमचा उपयोग काय?, असा सवाल ही संभाजीराजेंनी सरकारला विचारला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR