36.4 C
Latur
Tuesday, May 13, 2025
Homeपरभणीपाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्षपदी अनिलराव नखाते यांची निवड

पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्षपदी अनिलराव नखाते यांची निवड

मानवत : पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ कार्यकारणी बैठकीत संस्थाध्यक्ष विजयकुमार कत्रुवार यांचे अध्यक्षतेखाली उपाध्यक्षपदी अनिलराव नखाते तर सहसचिवपदी विजयकुमार दलाल तर संचालकपदी संजय लड्डा यांची निवड करण्यात आली आहे.

पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत मानवत येथे के.के.एम.महाविद्यालय, श्रीमती शकुंतला कांचनराव कत्रुवार विद्यालय, श्रीगणेश रामचंद्रराव कत्रुवार फार्मसी कॉलेज, सौ.रामकंवर लड्डा इंग्रजी व मराठी माध्यम शाळा, पाथरी मधील कै.स.गो.नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवनांद्रा अशा शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत.

मे २०२४ मध्ये उपाध्यक्ष द्वारकादास लड्डा यांचे निधन झाल्याने हे पद रिक्त झाले होते. मानवत येथे संस्थाध्यक्ष कत्रुवार यांचे अध्यक्षतेखाली कार्यकारी मंडळाची बैठक घेण्यात आली. यावेळी रिक्त उपाध्यक्षपदावर सहसचिव अनिलराव नखाते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे रिक्त झालेल्या सहसचिव पदावर विजयकुमार दलाल यांची तर संचालक म्हणून संजय लड्डा यांची निवड करण्यात आली.

यावेळी सचिव बालकीशन चांडक, कोषाध्यक्ष रामचंद्रराव कत्रुवार, संचालक जयकुमार काला, डॉ. आनंद कत्रुवार, दिलीप हिबारे, अ‍ॅड. डिगांबर बारटक्के, जगदीश बांगड, पदसिद्ध सहसचिव प्राचार्य के.के.एम महाविद्यालय यांची उपस्थिती होती. यावेळी कार्यकारी मंडळाच्या वतीने नवनिर्वाचित उपाध्यक्ष अनिलराव नखाते, सहसचिव विजयकुमार दलाल, संचालक संजय लड्डा यांचा सत्कार करण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR