26.6 C
Latur
Tuesday, September 24, 2024
Homeमहाराष्ट्र‘एन्काऊंटर’ हा शिंदे-फडणवीसांचा बनाव

‘एन्काऊंटर’ हा शिंदे-फडणवीसांचा बनाव

मुंबई : प्रतिनिधी
बदलापूरमध्ये घडलेल्या चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला आहे. पोलिसांनी स्वरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला आहे. तर कुणाला वाचविण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार एन्काऊंटरचा बनाव करत असल्याचा आरोप खा. संजय राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेच्या ‘एन्काऊंटर’नंतर आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अक्षयच्या मृत्यूवर संशय व्यक्त करत सरकारच्या भूमिकेवर राऊतांनी ताशेरे ओढले आहेत. पुढे बोलताना राऊत यांनी अक्षय शिंदे याला पोलिस घेऊन जात होते तेव्हा त्याचे हात बांधलेले व तोंडावर बुरखा होता.

त्यामुळे नक्की काय घडले? असा प्रश्न राऊतांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला विचारला आहे.
आरोपी अक्षय शिंदेने स्वत:वर गोळी झाडल्याची माहिती आधी समोर आली होती. त्यानंतर त्याचा एन्काऊंटर झाल्याचे समजले. हे सर्व संशयास्पद असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. पोलिस आणि राज्य सरकारवर विरोधकांनी टीका केली आहे.

सोमवारी (ता. २३) सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. अक्षयचा एन्काऊंटर झाला की केला? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे.अक्षय हा साधूसंत नव्हता. त्याने आधी पोलिसांवर गोळीबार केला. त्यामुळे स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याचे सत्ताधा-यांनी म्हटले आहे.

महिलांनी वाटले पेढे
अक्षय शिंदेला अटक केल्यानंतर त्याला आमच्या ताब्यात द्या किंवा फाशी द्या अशी मागणी बदलापूरच्या नागरिकांनी केली होती. यासाठी त्यांनी रेल रोको आणि रास्ता रोको आंदोलन देखील केले होते. अक्षयच्या एन्काउंटरनंतर बदलापूरमध्ये महिलांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. तर बदलापूर रेल्वे स्थानकावर बॅनर झळकावत जल्लोष करण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR