34.2 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्रगर्भपात करून मुलीला पुरले; अतिरक्तस्त्रावामुळे आईचा मृत्यू

गर्भपात करून मुलीला पुरले; अतिरक्तस्त्रावामुळे आईचा मृत्यू

इंदापूर : गर्भलिंगचिकित्सेनंतर खाजगी डॉक्टरकरवी गर्भपात करून नकोशीला जमिनीत गाडून टाकले. या प्रकरणात अतिरक्तस्त्रावामुळे २३ वर्षांच्या विवाहितेचा मृत्यू झाला. वडापुरी (ता. इंदापूर) येथे दि. २२ ते २३ सप्टेंबर दरम्यान घडलेल्या या घटनेस कारणीभूत असल्याच्या आरोपावरून त्या विवाहितेचा पती, सासू व सासरा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

पती व सास-याला अटक करण्यात आले आहे. सासू फरार आहे.
राहुल भीमराव धोत्रे (वय २८ वर्षे), लक्ष्मी भीमराव धोत्रे, भीमराव उत्तम धोत्रे (वय ५० वर्षे, तिघे रा. वडापुरी, ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. ऋतुजा राहुल धोत्रे (वय २३ वर्षे, रा. वडापुरी) असे मयत झालेल्या दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी तिचा भाऊ विशाल शंकर पवार (वय २५ वर्षे, रा.पिंपरद, ता. फलटण, जि. सातारा) याने इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR