19 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeलातूरबायोगॅस प्रकल्पांतून महिन्याला १२,६०० युनिट वीज!

बायोगॅस प्रकल्पांतून महिन्याला १२,६०० युनिट वीज!

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शहरात चार बायोगॅस प्रकल्पांची उभारणी करण्यात येत आहे. या चार प्र्रकल्पांपैकी दोन प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. त्यातून आजघडीला दररोज ४२० युनिट वीज निर्मिती होत आहे. महात्मा गांधी चौक व वरवंटी या दोन बायोगॅस प्रकल्पातून महिन्याला १२ हजार ६०० युनीट वीज निर्माण होत आहे. यामुळे लातूर शहर महानगरपालिकेची वीजेवरील खर्चाची मोठी बचत होत आहे.

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शहरातील वरवंटी कचरा डेपोवर दोन, महात्मा गांधी चौक आणि साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चौक परिसररातील फु ट मार्केट येथे प्रत्येकी एक असे चार बायोगॅस लातूर शहर महानगरपालिकेला मंजूर झाले आहेत. वरवंटी येथील पाच टन कच-यातून दररोज ३५० युनिट वीज निर्मिती प्रकल्प सुरु झाला आहे. महात्मा गांधी चौकातील बायोगॅस प्रकल्पातून दररोज ७० युनिट वीज निर्मिती करण्यात येत आहे. या दोन प्रकल्पांतून महिन्याला १२ हजार ६०० युनिट वीज निर्मिती होत आहे. अन्य दोन प्रकल्प सुरु झाल्यानंतर आणखी ४२० युनिट दररोज वीज निर्मिती होईल. बायोगॅसचे एकुण चार प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यापैकी दोन प्रकल्पांतून वीज निर्मिती सुरु झालेली आहे.

वरवंटी येथील एका प्रकल्पातून साडेतीनशे आािण महात्मा गांधी चौकातील प्रकल्पातून ७० युनिट वीज निर्मिती होते. या दोन्ही प्रकल्पातील मिळून ४२० युनिट दररोज वीज निर्मिती होत आहे. अन्य दोन प्रकल्प सुरु झाल्यानंतर आणखी ४२० युनिट दररोज वीज निर्मिती होईल. निर्माण केलेली वीज घंटागाडी आणि कचरा डेपोवर वापरली जात आहे. निर्माण होणारी वीज एलईडी बल्ब आािण जाळ्याच्या ग्रीन बेल्टकरीता वापरली जाणार आहे. एक टन खताच्या बायोगॅस प्रकल्पातून दररोज ७० युनिट वीज निर्मिती महात्मा गांधी चौकातील प्रकल्पातून होत आहे. या विजेतून इलेक्ट्रिकल २० वाहनांना चार्ज केले जात आहे. दाररोज सहा हजार रुपये या वाहनांना डिझेलसाठी खर्च होत होते. इलेक्ट्रिकल वाहनांच्या चार्जिंगची सोय स्वत: महानगरपालिकेच्या वीज निर्मितीतून झाल्यामुळे महानगरपालिकेचे दररोजचे सहा हजार रुपये वाचले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR