27.8 C
Latur
Sunday, May 12, 2024
Homeलातूरसोयाबीन कापूस प्रश्नी मंत्रालयाचा ताबा घेऊ

सोयाबीन कापूस प्रश्नी मंत्रालयाचा ताबा घेऊ

लातूर : प्रतिनिधी
राज्यात शेतकरी मरणाच्या दारात आहे. संपूर्ण राज्यात दुष्काळ आहे मात्र सरकारला दिसत नाही. सोयाबीन कापसाचे भाव नाकर्त्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कोसळले आहेत. शेतक-यांच्या प्रश्नाविषयी सरकार उदासीन आहे. अनेक आंदोलन, मोर्चे काढूनसुद्धा सरकारवर कसलाही परिणाम होत नाही म्हूणन बुधवारी २९ नोव्हेंबर रोजी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली सोयाबीनला ९ हजार रुपये भाव आणि कापसाला १२ हजार ५०० रुपये दर द्यावा यासाठी मंत्रालयाचा ताबा घेऊ या आशयाचे प्रसिद्धी पत्रक राजेंद्र मोरे आणि राजीव कसबे यांनी संयुक्तरित्या काढले आहे.

बुलढाणा येथे राज्यातील दुष्काळ, पीक विमा, सोयाबीन कापसाचे कोसळलेले भाव, एकरी दहा हजार मदत, नियमित कर्जफेड करणा-या उर्वरित शेतक-यांना ५० हजार प्रोत्साहनपर अनुदान, शेतक-यांसह शेतमजूर, महिला, वारकरी यांच्या दाहक प्रश्नावर लाखो जनसमुदयाच्या उपस्थितीत महाएल्गार मोर्चा काढण्यात आला होता. त्या दिवशी सरकारला मागण्या मंजूर करण्यासाठी विनंती करुन सात दिवसाचे अल्टीमेटम देण्यात आले होते. मात्र, सरकारने अद्याप कसलाही निर्णय घेतलेला नाही. उलट हे आंदोलन दडपण्यासाठी रविकांत तुपकर यांना खोट्या केसेस करुन अटक करण्यात आली होती. त्यावेळी तुपकर यांनी अन्नत्याग करण्याचा निर्णय घेऊन शेतक-यांसाठी सत्यागृह सुरु असून त्यांच्या आवाहनाला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद आहे. त्याअनुषंगाने असंख्य शेतकरी लातूरहुनसुद्धा मंगळवारी दुपारी मुंबईला निघणार आहेत, असं ही पत्रकात म्हटलं आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR