27.7 C
Latur
Monday, December 23, 2024
Homeलातूरमांजरा धरण ९१.६८ टक्के भरले

मांजरा धरण ९१.६८ टक्के भरले

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या मांजरा धरणााच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असल्याने मांजरा धरणात पाण्याचा येवा सुरु झाला आहे. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मांजरा धरण ९१.६८ टक्के भरले होते. धरणाची निर्धारित पाणीपातळी ६४२.३७ मीटर असून धरण ६४२.०५ टक्के भरले आहे. त्यामुळे आता मांजरा धरण क्षेत्रातील शेतीला पाणी मिळणार आहे.
मांजरा धरण परतीच्या पावसावर भरत असते. हा पूर्वानुभव आ.े मात्र यंदा ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. परतीचा पाऊस ३० सप्टेंबरनंतर सुरु होणार आहे. तत्पुर्वीच धरण भरत आले आहे. सध्या मांजरा धरणात २०९.३७६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. यातील १६२.२४६ दशलक्ष घनमीटर जिवंत पाणीसाठा आहे. मांजरा धरण कालवा समितीची बैठक झाल्यानंतर आणि शेतक-यांकडून मागणी आल्यानंतर मांजरा धरणातून शेतीला पाणी सोडण्याचा विचार होऊ शकतो.  लातूर जिल्ह्याच्या दृष्टीने तावरजा, रेणापूर, व्हटी, तिरु, देवर्जन, साकोळ, मसलगा आणि घरणी हे आठ मध्यम प्रकल्प अत्यंत महत्वाचे आहेत. त्यापैकी व्हटी व घरणी हे दोनच मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत्.ा.
तावरजा प्रकल्पात २२.४६ टक्के, रेणापूर प्रकल्पात ९७.६६ टक्के, तिरु प्रकल्पात ९६.७३ टक्के, देवर्जन प्रकल्पात ४८.९६ टक्के, साकोळ प्रकल्पात ४६.४९ टक्के, मसलगा प्रकल्पात ४७.८५ टक्के  पाणीसाठा आहे. आठ मध्यम प्रकल्पात ८६.९९३ दशलक्ष  घनमीटर उपयुक्त पाणीसाठा असून त्याची टक्केवारी ७१. २२ एवढी आहे.  दोन मोठे, आठ मध्यम व १३४ लघू असे एकुण १४४ प्रकल्पांत ५८७.२८४ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा म्हणजेच ८३.३५ टक्के पाणीसाठा आहे. या १४४ प्रकल्पांपैकी ३० प्रकल्प पुर्ण भरलेले आहेत. १९ प्रकल्पांत ७५ टक्क्यांपेक्षावर पाणीसाठा, १२ प्रकल्पांत ५१ ते ७५ टक्के, २१२५ ते ५० टक्के,  ४० प्रकल्पांत २५ टक्क्यांच्या  खाली, १८ प्रकल्प जोत्याखाली  तर ४ प्रकल्प अद्यापही कोरडे  आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR