लातूर : प्रतिनिधी
मराठवाड्यातील मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेटियर स्वीकारुन कुणबी मराठा प्रवर्गात आरक्षण द्यावे या मागणीसाठी १७ सप्टेंबरपासून उपोषणाला बसलेले ज्येष्ठ समाजसेवक विनायकराव पाटील यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओब्बासे यांच्या मध्यस्थीने अमरण उपोषण मागे घेतले. बेमुदत उपोषण मागे घेतले असले तरी देहत्याग करणार असल्याच्या निर्णयावर ठाम असल्याची भूमिका उपोषण मागे घेताना त्यांनी घेतली आहे.
मराठवाडयातील मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेटियर स्वीकारून कुणबी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी विनायकराव पाटील यांनी कवठा येथे १७ सप्टेंबरपासून अमरण उपोषण सुरू केले होते. आज मंगळवारी त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस होता. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत चालली होती. नाईचाकूर प्राथमिक केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. स्वाती चव्हाण व डॉ. खलील नूर उपोषण कालावधी दरम्यान नियमित अरोग्य तपासणी करित होते. त्यांच्या लघवीतील किटोण बॉडीज मध्ये वाढ झाली होती. पल्स सेल वाढले होते. त्यांच्या लघवीतील अलब्यूनीन च्या प्रमाणात वाढ झाली होती. किडणीतील ब्लड युरिया, नायट्रोजन, सिरम क्रीयाटीटीन मध्ये वाढ झाली होती. रक्त्तातील साखरेच्या प्रमाणात घट होऊन रक्तदाब वाढला होता.
सोमवारी रात्री मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली होती. मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओब्बासे , तहशिलदार गोंिवद येरमे, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार पोनि अश्वीनी भोसले. मंडलाधिकारी प्रवीण कोकणे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषण मागे घेण्या बाबत पाटील यांच्याशी विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन अखेर पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओब्बासे यांच्या हस्ते नारळपाणी घेऊन उपोषण मागे घेतले.
या वेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओब्बासे म्हणाले कि मुख्यमंत्री कार्यालया कडून विनायकराव पाटील यांच्या उपोषणाची दखल घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालया कडून पाटील यांची प्रकृती गंभीर असत्याचे सांगण्यात आल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांनी उपोषण मागे घ्यावे अशी विनंती त्यांना करण्यात आली . हैद्राबाद गॅझेटियर व मराठा आरक्षण जीआर दुरुस्ती करण्या करिता प्रशासकीय स्तरावरून कार्यवाही काण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. येणा-या पंधरा दिवसात शासन स्तरावर मराठा आरक्षणा बाबत अपेक्षित निर्णय होण्याची शक्यता असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. ओंब्बासे यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्हाधिका-यांच्या विनंतीला मान देऊन पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले. विकास पाटील, पोलीस पाटील अतुल सोनवणे, मलंग गुरुजी राजेंद्र सोनवणे , गणेश सोनवणे , सतीश पवार , तानाजी सोनवणे, भागवत सोनवणे सह विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळाच्या महिलां ग्रामस्थांची उपस्थिती होती.