21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयदिल्लीत मुसळधार पाऊस; अनेक उड्डाणे वळवली

दिल्लीत मुसळधार पाऊस; अनेक उड्डाणे वळवली

नवी दिल्ली : राष्टीय राजधानी दिल्लीत सोमवारी संध्याकाळी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटामुळे दिल्ली विमानतळावरील विमानसेवा प्रभावित झाली आहे. त्यामुळे अनेक उड्डाणे दिल्लीहून इतर ठिकाणी वळवण्यात आली आहेत. वृत्तसंस्थेने सांगितले की, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (दिल्ली विमानतळ) खराब हवामानामुळे गुवाहाटीहून दिल्लीला जाणारी विस्तारा फ्लाइट जयपूरकडे वळवण्यात आली आहे.

वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, कोलकाता ते दिल्ली जाणारी विस्तारा फ्लाइट देखील दिल्ली विमानतळावरील रहदारीमुळे लखनौच्या दिशेने वळवण्यात आली आहे. दिल्लीतील खराब हवामानामुळे इंडिगो एअरलाइनने प्रवास सल्लागार जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे दिल्लीतील विमानसेवा प्रभावित झाल्याचे त्यात सांगण्यात आले आहे. पावसानंतर दिल्लीच्या प्रदूषणात काहीशी घट अपेक्षित आहे. प्रादेशिक हवामान कार्यालयाने सोमवारी दिल्ली आणि आसपासच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यता वर्तवली होती. दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषणामुळे आकाशात धुके पसरले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR