लातूर : प्रतिनिधी
शिक्षक दिनाच्या २३ दिवसानंतर अखेर जिल्हा परिषदेच्या जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराची यादी जाहिर झाली आहे. त्यामुळे पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. असे असले तरी सलग तिन वर्षापासून शिक्षकांचे पुरस्कार वितरण पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे रखडले आहेत. त्यामुळे लातूरच्या पालकमंत्र्यांना यावर्षीतरी विधान सभा निवडणूकीच्या पूर्वी पुरस्कारासाठी वेळ मिळतो का याची चाचपणी केली जाणार आहे.
लातूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्राथमिक शिक्षण विभाग व माध्यमिक शिक्षण विभाग यांच्याकडूनन प्रत्येक तालुक्यातून १० अशा प्रमाणे २० शिक्षक व एक दिव्यांग अशा २१ शिक्षकांची जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली जाते. सदर प्रक्रीया ही निवड समितीच्यामार्फत करण्यात येते. शिक्षण विभागाने २०२२-२३, २०२३-२४ या वर्षांचे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारथी निवडले. तर २०२४-२५ या वर्षाच्या शिक्षकांची जिल्हा निवड समितीने जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारर्थीची निवड करून यादी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजी नगर येथील आयुक्त कार्यालयाकडे मंजूरीसाठी .लातूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पाठवली होती. या यादीला विभागीय आयुक्तांकडून मंजूरी मिळाल्याचे शुक्रवारी सायंकाळी जाहिर केले आहे.
जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारामध्ये प्राथमिक शिक्षकांमध्ये प्राथमिक शिक्षक मुजावर हसन रसूलसाब उन्नी ता. अहमदपूर, गुट्टेवाउीकर राठोड कविता नाथराव राळगा ता. अहमदपूर, विजयकुमार लक्ष्मणराव गबाळे बामणी ता. उदगीर, सावंत भाऊराव नागोराव घरणी ता. चाकूर, डोंगरे राजेश्वर भाऊराव जगळपूर ता. जळकोट, उदबाळे विश्वनाथ धोंडिबा कमालवाडी देवणी, पांचाळ मनोजकुमार धोंडीराम बिटरगाव ता. रेणापूर, प्राथमिक पदविधर मध्ये जगताप संजय संभाजी करजगांव औसा, अंबुलगेकर संजीव अंबादास जाजनूर ता. निलंगा, गुडे उल्का गणपत हरंगूळ ता. लातूर, येडले राधाबाई हाणमंतराव कानेगाव ता. शिरूर अनंतपाळ. माध्यमिक शिक्षकांमध्ये पालककर्तावार संजय हनुमंतराव खंडाळी अहमदपूर, प्रतिभा तुकाराम बनसोडे नागरसोंगा ता. औसा, उषाताई बब्रुवान मोमिनगिरे वाढवाणा ता. उदगीर, फुलारी शिल्पा गोविंद भातखेडा ता. लातूर, विशाखा देवीदास चव्हाण वडवळ नागनाथ ता. चाकूर, माटोरे शिवदास बालाजी जळकोट, शिला बालकिसन तम्मलवार बोरोळ ता. देवणी, धम्मपाल नारायण निवळे येरोळे ता. शिरूर अनंतपाळ, दिव्यांग शिक्षकामधून भारत किशनराव कांबळे बुधोडा ता. औसा या ११ प्राथमिक शिक्षक ८ माध्यमिक शिक्षक व १ दिव्यांग शिक्षक त्याचप्रमाणे जिल्हास्तरावर प्रोत्साहन पर पुरस्कार सावळकर गणेश राणबा प्रा. शा. हाकेतांडा ता. रेणापूर व भोसले संदिप शिवाजीराव प्रा. शा. भातखेडा ता. लातूर यांना दिला जाणार असून या पुरस्काराचीही घोषणा करण्यात आली आहे.
पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, शिक्षण अधिकारी प्राथमिक वंदना फुटाणे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी नागेश मापारी, मुरूड डायटच्या प्राचार्य भगिरती गिरी, उपशिक्षणाधिकारी प्रमोद पवार व विस्तार अधिकारी संजिव पारसेवार व कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.