27.1 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रअजित पवार गटात मोठी फूट!

अजित पवार गटात मोठी फूट!

दापोली नगर परिषदेतील ८ पैकी ७ नगरसेवकांनी स्थापन केला वेगळा गट

चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची जन सन्मान यात्रा आज कोकणात होती. श्रीवर्धन आणि चिपळूण इथल्या सभांमधून अजित पवारांनी तिथल्या नागरिकांशी संवाद साधला. अशातच कोकणात अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, अजित पवारांचं गुलाबी वादळ कोकणात धडकलंय…रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि रत्नागिरीतील चिपळूण येथे राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेचे कार्यक्रम झाले. कोकणात अजित पवार गटात फूट पडल्याचे दिसत आहे. दापोली नगर परिषदेतील ८ पैकी ७ नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केला आहे. महायुतीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
दापोली नगर परिषदेतील आठ पैकी सात नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केला आहे.

उपनगराध्यक्ष खालीद रखांगे यांच्या नेतृत्वाखाली वेगळ्या गटाची स्थापना करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. वेगळा गट स्थापन केलेले नगरसेवक लवकरच राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत.

कोकणात राजकीय आखाडा तापणार
बारामतीसह अजितदादांचे सर्व उमेदवार पराभूत होत असताना कोकणात सुनील तटकरे यांनी रायगडची जागा राखली. त्यामुळे आधी मविआसह महायुतीच्या सरकारमध्ये तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांना आमदारकीच्या पहिल्याच काळात मंत्रिपदाची संधी मिळाली. आदिती यांच्या श्रीवर्धन मतदारसंघातून अजित पवार यांनी आपल्या कोकण दौ-याची सुरुवात केली. अनेक विकासकामांसाठी भरघोस निधी देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR