24.6 C
Latur
Sunday, December 1, 2024
Homeउद्योग‘आयडीएफसी’चे विलीनीकरण; बॅँकेला ६०० कोटींचा फायदा

‘आयडीएफसी’चे विलीनीकरण; बॅँकेला ६०० कोटींचा फायदा

 

मुंबई : वृत्तसंस्था
आयडीएफसी फर्स्ट बँक आणि ‘आयडीएफसी’ लिमिटेडचे ​​विलीनीकरण पूर्ण झाले आहे. या विलीनीकरणामुळे भागधारकांना फायदा होणार आहे. ‘आयडीएफसी’च्या प्रत्येक भागधारकाला १०० शेअर्सच्या बदल्यात ‘आयडीएफसी’ बँकेचे १५५ शेअर्स दिले जातील. या विलीनीकरणामुळे ‘आयडीएफसी’ ची कॉर्पोरेट रचना अधिक चांगली होणार आहे. या सोबतच प्रवर्तकांचे होल्डिंग कमी होणार आहे.

‘आयडीएफसी’ फर्स्ट बँकेने शुक्रवारी हे विलीनीकरण पूर्ण झाल्याची घोषणा केली. शेअरधारक आणि नियामकांच्या मंजुरीनंतर पुढील महिन्यापासून हे विलीनीकरण लागू केले जाईल, असे बँकेने म्हटले आहे. ‘आयडीएफसी’ने शेअर्सच्या देवाणघेवाणीसाठी १० ऑक्टोबर ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. हे शेअर्स ३१ ऑक्टोबरपूर्वी भागधारकांना दिले जातील.

या विलीनीकरणामुळे सर्वात मोठा फायदा हा होणार आहे की, बँकेची कोणतीही होल्डिंग कंपनी राहणार नाही. बँकेने म्हटले आहे की, आता आमचे शेअरहोल्ंिडग इतर मोठ्या खाजगी क्षेत्रातील बँकांप्रमाणे होईल. इतर खाजगी क्षेत्रातील बँकांमध्येही प्रमोटर होल्डिंग नाही. याशिवाय बँकेचे व्यवस्थापनही सोपे होणार आहे.

या विलीनीकरणामुळे बँकेला सुमारे ६०० कोटी रुपये मिळणार आहेत. आयडीएफसी फर्स्ट बँकेचे एमडी आणि सीईओ व्ही. वैद्यनाथन म्हणाले की, आम्ही जवळपास दोन वर्षांपासून या विलीनीकरणासाठी प्रयत्न करत होतो. खूप मेहनतीनंतर आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो आहोत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR