36.1 C
Latur
Monday, April 21, 2025
Homeमहाराष्ट्ररत्नागिरीत वृद्ध महिलेला कोंडून दागिन्यांवर डल्ला

रत्नागिरीत वृद्ध महिलेला कोंडून दागिन्यांवर डल्ला

रत्नागिरी : प्रतिनिधी
खोली भाड्याने मिळेल का? अशी चौकशी करत वृद्ध महिलेला घरात कोंडून तिच्याकडील दागिन्यांची चोरी केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी घडली. रत्नागिरी शहरातील राधाकृष्ण टॉकिज परिसरात भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. राधाकृष्ण टॉकिजसमोरील दत्त कॅफेच्या पाठीमागील बाजूला ही वृद्ध महिला एकटीच राहते.

शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घर भाड्याने आहे का? म्हणून एक जोडपे चौकशीसाठी आले होते. काही वेळाने वृद्ध महिला बाजूला गेल्या होत्या. त्यावेळी घराचा दरवाजा उघडाच होता. हीच संधी साधून हे जोडपे घरात शिरले.

त्यानंतर वृद्ध महिला घरात येताच त्यांच्या पाठोपाठ एक पुरुष गेला आणि त्याने घरातील पुढील व मागील दोन्ही दरवाजे लावून घेत वृद्धेचे तोंड दाबून सगळे सोन्याचे दागिने काढून घेतले. मात्र, तिच्या हातातील एक बांगडी काढता न आल्याने मिळालेले दागिने घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR