26.3 C
Latur
Sunday, September 29, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यकृषी पुरस्कार सोहळ्यात शेतक-यांचा राडा

राज्यकृषी पुरस्कार सोहळ्यात शेतक-यांचा राडा

उशीर झाल्याने शेतकरी संतापले कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी घातली समजूत

वरळी : राज्याच्या कृषी पुरस्कार सोहळ्यात राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम नियोजित होता. मात्र या कार्यक्रमाला उशीर झाल्याने तसेच राज्यपालांकडून अत्यंत कमी वेळ देण्यात आल्याने नाराज शेतक-यांनी गोंधळ करण्यास सुरूवात केली. यावेळी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतक-यांची समजूत काढली. यावेळी नाराज शेतक-यांनी मात्र गोंधळ घातल्याचे पाहायला मिळाले.

कार्यक्रमाला उशीर झाल्याने राज्यपालांच्या हस्ते काही शेतक-यांना पुरस्कार देण्यात आला. यानंतर राज्य शासन देत असलेला पुरस्कार आम्हाला राज्यपालांच्या हस्तेच हवा आहे असे शेतक-यांचे म्हणणे होते. यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी शेतक-यांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार देऊ असे आश्वासन दिल्यामुळे शेतकरी शांत झाले. पण याआधी शेतक-यांनी फेटे स्टेजच्या दिशेने फेकत गोंधळ घातल्याचा पाहायला मिळाले.
या पुरस्कार सोहळ्यात राज्य शासनातर्फे सन २०२० ते २०२३ या वर्षीच्या ४४८ पुरस्कार्थींचा पुरस्कार वितरण व सत्कार समारंभाचा कार्यक्रम होणार आहे. नऊ विभांगामध्ये कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या शेतकरी, व्यक्ती, संस्था, गट, अधिकारी आणि कर्मचारी यांना हे कृषी सेवारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल.

शेतीमधील उत्पादकता आणि उत्पन्न वाढीकरिता योगदान देणा-या व्यक्ती व संस्थांना राज्य शासनाकडून पुरस्कार दिले जातात. हा कार्यक्रम महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते वरळीतील नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया (डोम) येथे होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR