13.6 C
Latur
Thursday, November 28, 2024
Homeराष्ट्रीयतिरुपती प्रसाद लाडू भेसळीचा ‘एसआयटी’द्वारे तपास स्थगित

तिरुपती प्रसाद लाडू भेसळीचा ‘एसआयटी’द्वारे तपास स्थगित

तिरुपती : वृत्तसंस्था
लाडू भेसळ प्रकरणाचा ‘एसआयटी’ तपास तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन असल्यामुळे तपास पुढे ढकलण्यात आला आहे, असे आंध्र प्रदेशचे डीजीपी द्वारका तिरुमला राव यांनी मंगळवारी (दि.१) सांगितले. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी नुकतेच तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर झाल्याचा आरोप केला होता.

या प्रकरणाच्या तपासासाठी नऊ सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले होते. आंध्र प्रदेशचे डीजीपी द्वारका तिरुमला राव यांच्या सूचनेनुसार, तिरुपती मंदिरातील लाडू प्रसाद भेसळ प्रकरणाचा तपास करणा-या एसआयटीने ३ ऑक्टोबरपर्यंत तपास तात्पुरता स्थगित केला आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत डीजीपी द्वारका तिरुमला राव म्हणाले की, एसआयटीच्या स्थापनेबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर काल न्यायालयात सुनावणी झाली. आयजीच्या नेतृत्वाखाली आमच्या टीमने तिरुमला तिरूपती देवस्थानम (टीटीडी) च्या विविध ठिकाणांना, खरेदीचे क्षेत्र, नमुना संकलन क्षेत्राला भेट दिली. टीमने लोकांची चौकशी केली आणि जबाब नोंदवले आहेत.

मागील राज्य सरकारच्या कार्यकाळात तिरुपती बालाजी देवस्थानतर्फे प्रसाद म्हणून देण्यात येणारा लाडू बनविण्यासाठी निकृष्ट पदार्थ व प्राण्याच्या चरबीचा वापर करण्यात आला होता, असा अहवाल गुजरातमधील एका प्रयोगशाळेने दिला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR