सोलापूर : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्याने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या निधीतून सोलापूर महानगरपालिका महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान जिल्हास्तर योजनेअंतर्गत सन २०२३-२४या हेड अंतर्गत ७ लाख ८९ हजार ९०४ रुपये खर्चित प्रभाग क्रमांक २२ येथील डायमंड बेकरी मंजुनाथ नगर येथे रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे शुभारंभ करण्यात आले.
याप्रसंगी विजय गायकवाड,शुभम जाधव, अनिकेत जाधव, गोपाळ जाधव, विलास गायकवाड, बाबू जाधव, विजय वाघमारे, असलम शेख, जितेश भोसले,उद्धव पवार, अब्दुल शेख, रहमतअभी शेख,शबानाभी शेख, फरीदा विजापुरे,सत्यशिल सर्वगोड, सुनिता जाधव, लक्ष्मण कांबळे, पुष्पा तीर्थ आदींचे प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विधिबात पूजन होऊन नारळ फोडून या रस्त्याचे शुभारंभ करण्यात आले. यावेळी बोलताना प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव म्हणाले की प्रभाग क्रमांक २२ मधील प्रत्यक्षात नागरिकांना आवश्यक असलेला पाणीपुरवठा, चांगले रस्ते,आरोग्य सुविधा, सक्षम कचऱ्याचे व्यवस्थापन, दिवाबत्ती अशा अन्य मूलभूत सुविधा प्राधान्याने नागरिकांना पुरविल्या येणाऱ्या काळात सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक २२ हे सर्व सोयी सुविधा नियुक्त हायटेक असे प्रभाग करण्याचा आपला मानस आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सहकार्याने प्रभागांमध्ये विकासाची गंगा आणली कोट्यावधी रुपयांची कामे प्रभागात झाले असून या पुढील काळात देखील नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी आपण नेहमी अग्रेसर राहू असेही ते म्हणाले