श्रीनगर : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या आणि तिस-या टप्प्यासाठी मंगळवारी मतदान झाले. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंतच्या अपडेटनुसार, ७ जिल्ह्यांतील ४० विधानसभा जागांवर ६५.६५% मतदान झाले.
उधमपूरमध्ये सर्वाधिक ७२.९१ टक्के मतदान झाले. बारामुल्लामध्ये सर्वात कमी ५५.७३% मतदान झाले. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान झाले. पहिल्या आणि दुस-या टप्प्यापेक्षा तिस-या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी जास्त होती. पहिल्या टप्प्यात ६१.३८% तर दुस-या टप्प्यात ५७.३१% मतदान झाले.
तिस-या टप्प्यातील ४० जागांपैकी २४ जागा जम्मू विभागातील आणि १६ काश्मीर खो-यातील आहेत. शेवटच्या टप्प्यात ४१५ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये ३८७ पुरुष आणि २८ महिला उमेदवार आहेत. दरम्यान, पीडीपीचे प्रवक्ते मोहित भान यांनी कुपवाडा येथील हातमुल्ला मतदान केंद्रावर संथ गतीने मतदान होत असल्याचा आरोप केला आहे. ते वर म्हणाले मतदानाची वेळ संपेपर्यंत मतदारांना मदत करणारा या पृथ्वीवर कोणीही नाही.