जिंतूर : शहरातील डॉक्टर सुभाष चंद्र राठी बालक विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त शाळेमध्ये स्वच्छता अभियान राबवून शहरातील प्राध्यापक कॉलनी, खैरी प्लॉट, सटवाई माता मंदिर परिसरमध्ये चला आपले जिंतूर स्वच्छ करूया हा संदेश देणारे एक पथनाट्य परिसरातील नागरिकां समोर सादर केले.
आपले जिंतूर प्लास्टिक मुक्त झाले पाहिजे आपण ओला व सुका कचरा यांचे वर्गीकरण करून ओल्या कच-यापासून कंपोस्ट खत कसे निर्माण करता येते व त्याचा शेतीसाठी आपण कशा पद्धतीने उपयोग करून घेऊ शकतो यासंबंधी सुंदर अशी पथनाटिका शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन नागरिकां समोर सादर केली. या पथनाट्यमध्ये अनिकेत चव्हाण, स्नेहल बांगर, वेदिका भायकर, श्रावणी रोकडे, वेदिका सरकटे, सोजल खंदारे, स्वरा उंडे, कृष्णा गरड, वेदांत लकडे, विनायक सोनुने, हर्षदा आडे, आराध्या चव्हाण, धनंजय काळे, अक्षय वट्टमवार, श्रीयुष पुणेकर, समृद्धी लोखंडे, नरेश सोमानी, अनुष्का कोकडवार, पांडुरंग वराड, आराध्या कुरे, सह्याद्री थोरात, शिवतेज वावरे, कृष्णा सानप, समर्थ घुगे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
शाळेच्या संचालिका पद्माताई तोष्णीवाल यांच्या संकल्पनेतून हे पथनाट्य सादर करण्यात आले होते. मुख्याध्यापक गजानन तिखे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे शिक्षक सुभाष चोपडे, प्रसाद घुगे, परसराम खंदारे, गजानन अंभोरे, संजीवनी गट्टावार, गणेश रूघे, स्वप्निल येरमवार, प्रदीप राठोड या शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.