22.9 C
Latur
Monday, December 30, 2024
Homeमहाराष्ट्रयंदा ला निनाचा प्रभाव, थंडीचा कडाका वाढणार!

यंदा ला निनाचा प्रभाव, थंडीचा कडाका वाढणार!

मुंबई : प्रतिनिधी
भारतीय हवामानशास्त्र विभागाने येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत देशातून मान्सून निघून जाईल, असा अंदाज वर्तवला आहे. या वर्षी देशात नेहमीपेक्षा ८ टक्के जास्त पाऊस झाला. यासह आता यंदाची थंडीसुद्धा अशीच कडक पडणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. विशेष म्हणजे उत्तर भारतात दिल्ली-एनसीआर आणि आजूबाजूच्या प्रदेशांमध्ये कडक थंडीची लाट येणार असल्याचेही हवामान खात्याने म्हटले आहे. पाऊस संपताच अल निनाचा प्रभाव सक्रीय होणार आहे. त्यामुळे थंडीचा कडाका वाढू शकतो. याची प्रचिती पुढील महिन्यापासून येऊ शकते, असाही अंदाज वर्तवला गेला आहे.

आधी तीव्र उष्णता आणि त्यानंतर यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस सहन केल्यानंतर भारताला आता यंदाच्या हिवाळ््यात तीव्र थंडीचा सामना करावा लागणार आहे. ऐन ऑक्टोबरमध्ये एकीकडे नागरिकांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. दुसरीकडे थंडीची दिलासादायक बातमीही समोर आली आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये ला निनाचा प्रभाव सक्रिय होण्याच्या शक्यतेमुळे तीव्र हिवाळ््याचा अंदाज मांडण्यात येत आहे.

आयएमडीचा अंदाज आहे की, याच महिन्यांत ला निनाचा प्रभाव सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीची तीव्रता वाढणार आहे. आता थंडीची तीव्रता नेमकी किती असेल, याचा अंदाज नोव्हेंबरमध्ये येणार आहे. जर ला निना प्रभाव ऑक्टोबरमध्ये सक्रिय झाला तर डिसेंबर आणि जानेवारीत तापमान लक्षणीयरित्या कमी होऊ शकते. साधारणपणे ला निना इफेक्टमुळे तापमानात घट होते. ला निनामुळे तापमानात घट होते आणि तापमानात गारवा वाढतो. ला निनाच्या प्रभावामुळे पूर्वेकडील वारे समुद्राचे पाणी पश्चिमेकडे ढकलतात आणि समुद्राचा पृष्ठभाग थंड करतात.

हवामानाच्या संभाव्य
बदलावर बारीक नजर
आयएमडीच्या अंदाजानुसार ऑक्टोबर ते नोव्हेंबरदरम्यान ला निना प्रभाव सक्रिय होण्याची शक्यता आहे. जेव्हा ला निना येते, तेव्हा सामान्य तापमानापेक्षा थंडीचा अनुभव जास्त येतो. एकूणच आयएमडी आणि जागतिक हवामान संस्थेला ला निनाच्या संभाव्य बदलावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. नोव्हेंबरपर्यंत येऊ घातलेल्या हिवाळ््याच्या तीव्रतेबद्दल अंदाज उपलब्ध होत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR