23 C
Latur
Wednesday, December 4, 2024
Homeमहाराष्ट्रवाटेत थांबलेल्या पिकअपला टेम्पोची धडक;१२ भाविक गंभीर जखमी

वाटेत थांबलेल्या पिकअपला टेम्पोची धडक;१२ भाविक गंभीर जखमी

सांगोला : कोल्हापूर येथून भवानी ज्योत घेऊन येताना वाटेत थांबलेल्या पिकअपला भरधाव जाणा-या टेम्पोने पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात डिकसळ (ता सांगोला) येथील श्री लक्ष्मी देवी नवरात्र उत्सव मंडळाचे १२ तरुण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर सांगली येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना आज गुरुवार पहाटेच्या सुमारास विजापूर-गुहागर मार्गावरील जांभुळवाडी पाटी (ता. जत, जि.सांगली) येथे घडली आहे.

दरम्यान, जखमींवर जत येथील खाजगी व ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र अपघातानंतर तरुणांनी सकाळी ७ वाजण्यापूर्वीच भवानी ज्योत गावात घेऊन दाखल झाले आहेत. डिकसळ येथील लक्ष्मी देवी नवरात्र उत्सव मंडळाचे सुमारे १५० तरुण भवानी ज्योत आणण्यासाठी बुधवारी चारचाकी, दुचाकीवररून कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवी मंदिरात गेले होते.

गुरुवारी पहाटे ३ च्या सुमारास ज्योत घेऊन परत येताना पिकअप जांभुळवाडी पाटी याठिकाणी थांबली होती, त्यादरम्यान नागजकडून विजापूरकडे जाणा-या टेम्पोने पिकअपला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात घडला. दरम्यान अपघात घडल्यानंतर सांगोला कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक, माजी सरपंच चंद्रकांत करांडे, पत्रकार नाना हालगंडे यांनी जखमींना तातडीने उपचाराकरिता दवाखान्यात नेऊन मदत केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR