19 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeमुख्य बातम्याआता ई-डिव्हाईस करणार मुख कर्करोगाचे निदान!

आता ई-डिव्हाईस करणार मुख कर्करोगाचे निदान!

‘टूथ-ब्रश’। ९० टक्के अचूक निदान; पॉवर, हिस्ट्री बॅकअपची सुविधा, १,७७,७५७ रुग्णांनी गमावला जीव

 

कानपूर : वृत्तसंस्था
भारतासह जगभरात मुख कर्करोग हा च्ािंतेचा विषय बनला आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, २०२० मध्ये मुख कर्करोग झाल्यामुळे एकूण १,७७,७५७ लोकांनी आपला जीव गमावला. हा जागतिक स्तरावर १३ वा सर्वात सामान्य कर्करोग आहे. भारतात याचे प्रमाण जास्त आहे, कारण येथील लोक मोठ्या संख्येने गुटखा आणि पान मसाला यासारख्या गोष्टी खातात.

आयआयटी कानपूरने एक डिव्हाईस तयार केले आहे. या डिव्हाईसच्या मदतीने मुख कर्करोग त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात शोधला जाऊ शकतो. हे डिव्हाईस डिसेंबर २०२४ पर्यंत बाजारात दाखल होईल अशी शक्यता वर्तविली जात आहे.

प्रोफेसर जयंत कुमार स्ािंह हे आयआयटी कानपूर येथील केमिकल इंजिनिअरिंग विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत. आयआयटीने कानपूर शहरातील जवळपास ३ हजार लोकांवर या डिव्हाईसची टेस्ट केली. ज्यामध्ये शालेय लोक, रुग्णालयातील कर्मचारी आणि कारखान्यातील कामगारांचा समावेश आहे. प्रोफेसर जयंत कुमार यांच्या म्हणण्यानुसार, मुख कर्करोग पहिल्या टप्प्यातच आढळला, तर या आजाराला ब-याच अंशी प्रतिबंध करणे शक्य आहे.

भारतात असे अनेक लोक आहेत, ज्यांना या कॅन्सरची दुस-या किंवा तिस-या टप्प्यात माहिती मिळते, तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो आणि उपचार करणे कठीण होऊन बसते. अशा परिस्थितीत ब्रशच्या आकाराचे हे डिव्हाईस महत्त्वाचे ठरू शकते. हे एक सामान्य डिव्हाईस आहे. ज्यामध्ये व्हाईट आणि फ्लोरोसेंट लाइट सोर्सचा वापर केला जाते. याला स्मार्टफोन, टॅब्लेट, आयपॅड सारख्या गॅझेट्सशी वायरलेस पद्धतीने कनेक्ट केले जाऊ शकते, असे प्रोफेसर जयंत कुमार यांनी सांगितले.

या डिव्हाईसमध्ये पॉवर बॅकअप आहे. तसेच, ते ट्रॅकिंग आणि डेटा हिस्ट्री देखील संग्रहित करते. हे डिव्हाईस क्लिनिकल सेटिंग्जमध्ये ९० टक्के अचूकता देऊ शकते. हे वापरण्यास सुरक्षित आहे आणि कोणत्याही प्रकारच्या रासायनिक उपचारांची आवश्यकता नाही. हे ब्रशसारखे डिव्हाईस कर्करोगाच्या पेशी आणि सामान्य पेशीमधील फरक सांगू शकते. याद्वारे दोन्ही बाजूंचे गाल, जीभ टेस्ट केली जाऊ शकते, असे प्रोफेसर जयंत कुमार यांनी सांगितले.

डिव्हाईसची किंमत किमान १ लाख रु.
मुख कर्करोगाचे निदान करणा-या या डिव्हाईसची किंमत एक ते दोन लाख रुपयांच्या दरम्यान निश्चित केली जाण्याची शक्यता आहे. कारण, हे डिव्हाईस तयार करण्यासाठी अशी अनेक डिव्हाईसची मदत घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे ब्रश असलेल्या या स्ािंगल डिव्हाईसने जवळपास ५ लाख रूग्णांची टेस्ट केली जाऊ शकते, ज्यामुळे ते एकूणच किफायतशीर होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR