15.6 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रगीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात

गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात

  मुंबई  : प्रतिनिधी
 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. मुंबईत तर प्रचंड घडामोडी घडत आहेत. प्रत्येक पक्ष बेरजेचं गणित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे माजी नगरसेविका तथा अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याची कन्या गीता गवळी शिवसेना ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे.
दक्षिण मुंबईत अरुण गवळीला मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत करण्यासाठी ठाकरे गटाची ही रणनीती असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीवेळी गीता गवळी यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. त्यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गीता गवळी यांना महापौर करण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर आता गीता गवळी या ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे.
विशेष म्हणजे ठाकरे गटाचे सचिव तथा आमदार मिलिंद नार्वेकर यांनी गीता गवळी यांची दगडी चाळीत जाऊन भेट घेतली आहे. गीता गवळी भायखळा विधानसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पाच महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीवेळी गीता गवळी यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र त्यानंतर बदललेल्या गणितावरून गीता गवळी मशालीवर निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. अरुण गवळी यांनी स्थापन केलेला अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी या नगरसेविका होत्या. त्याचप्रमाणे आरोग्य समितीच्या अध्यक्षादेखील गीता गवळी होत्या. सध्या भायखळा विधानसभेत शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव आहेत. या ठिकाणी ठाकरे गटाकडून आणखी पदाधिकारी देखील इच्छुक आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR