21.2 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रछोटी भाभीचा पंटर चिपड्या जेरबंद

छोटी भाभीचा पंटर चिपड्या जेरबंद

नाशिक : गेल्या वर्षी वडाळागावात छोटी भाभी उर्फ नसरिण शेख हिचा एमडी ड्रगजाचा अड्डा उदधवस्त केला होता. याचप्रकरणात संबंध असल्याने शहर गुन्हेशाखेने संशयित व चिपड्या उर्फ इरफान नूर मोहम्मद शेख (३०, रा सादिकनगर, वडाळागाव) यास बुधवारी (ता. २) रात्री अटक केली आहे. संशयित चिपड्याची राजकीय नेत्यांशी जवळीक असल्यानेच त्याच्यावर कारवाई होत नसल्याचे आरोप यापूर्वी झाले होते. मात्र या कारवाईमुळे अनेकांचा भुवया उंचावल्या असून तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

गेल्या वर्षी मुंबई पोलिसांनी शिंदे गावात एमडी माफिया ललित पवार याचा कारखाना उद्ध्वस्त केला. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात नाशिक पोलिसांनी वडाळागावात मध्यरात्री छापा टाकून छोटी भाभी उर्फ नसरीन शेख हिला ५४ ग्रॅम एमडीसह अटक केली होती. याप्रकरणात पोलिसांनी तिचा पती इम्तियाज शेख, वसीम रफिक शेख यांच्यासह ड्रग्ज पेडलर सलमान फलके, शब्बीर उर्फ आयना अब्दुल अजिज मेमन यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर मात्र या गुन्ह्याचा तपास थंडावला होता.

दरम्यान, आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी सदरील गुन्ह्याच्या तपासाच्या सूचना दिल्या असता शहर गुन्हेशाखा युनिट दोनच्या पथकाने किरण सोनटक्के यास सिन्नरमधून अटक केली. त्याच्या चौकशीतून संशयित चिपड्या उर्फ इरफान शेख याचाही छोटी भाभी ड्रग्ज प्रकरणाशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले असता, युनिट दोनच्या पथकाने बुधवारी (ता.२) रात्री सादिकनगरमधून अटक केली. अटक केलेल्या दोघा संशयितांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

छोटी भाभीच्या होता संपर्कात
गुन्हे शाखेने संशयित चिपड्या याचा शोध घेत असताना त्याचे तांत्रिक विश्लेषण केले असता धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली. तो छोटी भाभीच्या सतत संपर्कात होता. दोघांमध्ये मोठ्याप्रमाणात फोन कॉल्स असल्याचेही समोर आलेले आहे.

राजकीय वरदहस्त
गेल्या वर्षी वडाळागावातील छोट्या भाभीविरोधातील एमडीची कारवाई झाली असता, त्यावेळीही चिपड्याचे नाव चर्चेत होते. परंतु त्याचे सत्ताधारी आमदाराशी जवळीक असल्याने त्याच्यावर कारवाई होत नसल्याचे आरोप विरोधकांनी केले होते. मात्र, चिपड्याच्या अटकेमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या असून, चौकशीत आणखी कोणाचे नावे समोर येतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR