24.6 C
Latur
Saturday, October 5, 2024
Homeमहाराष्ट्रमोदीजी महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात

मोदीजी महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात

पोहरादेवी : बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे उभारण्यात आलेल्या बंजारा विरासत या म्युझियमचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही असे म्हटले आहे. तसेच मोदी महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, नुसते भाषण देऊन जात नाहीत. ते भरभरून देऊन जातात असे म्हणत पंतप्रधानांचे भरभरून कौतुक केले आहे.

बंजारा विरासतचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण झाले आहे. सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा हा दिवस आहे. तुम्ही भाग्यवान आहात. रामराव महाराजांनी इच्छा व्यक्त केली होती, की पंतप्रधानांनी पोहरादेवीला यावे. पण तो योग इतर कोणाच्या नशिबात आला नाही. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नशिबात तो योग होता. बंजारा समाजाचा इतिहास जपण्याचे काम आपल्याला करायचे आहे. भारताला महाशक्ती बनण्यापासून कोणी रोखू शकत नाही कारण मोदींचा प्रभाव तेवढा वाढत आहे. मोदी देशाची शान आहेत. मोदींंच्या प्रेरणेने, आशीर्वादाने राज्याच्या विकासाला स्पीड आला आहे. गती आली आहे. डबल इंजिन सरकारचे काम विकासाच्या बुलेटच्या वेगाने पुढे जात आहे. ऐतिहासिक कल्याणकारी योजनांमुळे राज्यातील जनतेच्या चेह-यावर आनंद दिसत आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरलेली आहे. दोन कोटींहून जास्त असलेल्या आमच्या बहिणींच्या खात्यात तीन हप्ते जात आहेत. विरोधक म्हणतात आम्ही ही योजना बंद करू परंतु कोणीही लाडकी बहीण योजना कधीच बंद करू शकणार नाही. कारण ही योजना आमच्या गोरगरीब बहिणींसाठी आहे. डबल इंजिन सरकार सर्वांना न्याय देण्याचं काम करत आहे. आपले सरकार हे त्यामुळेच लाडकं सरकार झाले आहे.

मोदी महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, नुसते भाषण देऊन जात नाहीत. ते भरभरून देऊन जातात. ते आमच्याकडून काम करून घेतात आणि पाठीवर शाबासकीची थापही देऊन जातात. हा त्यांचा मोठेपणा आहे. परंतू त्यानंतरही विरोधक टीका करत राहतात. मोदींनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. मोठा इतिहास आहे. नवनवीन निर्णय, कामे ही मोदींच्या काळात होतात असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR