ग्वालियर : बांगलादेशविरुद्ध ट्वेंटी-२० मालिकेसाठी कर्णधार सूर्यकुमार यादवने भारतीय संघाची सलामीजोडी जाहीर केली आहे. अभिषेक शर्मा, अभिषेकसोबत संजू सॅमसन ओपनिंग करेल असे कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितले. बांगलादेशविरुद्ध पहिल्या ट्वेंटी-२० सामन्याची रणनिती ठरली असून भारतीय संघ ग्वालियरमधील दोन दिवसांच्या सरावानंतर पहिल्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे.
कसोटी मालिकेनंतर टीम इंडिया ट्वेंटी-२० मालिकेत बांगलादेशला नमवण्यासाठी सज्ज झाली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली युवा जोश असलेला भारतीय संघ उद्या बांगलादेशविरुद्ध मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. ग्वालियरच्या माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर ही मॅच होणार आहे.
ग्वालियरच्या नवीन ठिकाणी होणारा हा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना आहे. दोन दिवसांच्या सरावानंतर सूर्यकुमार यादवला ट्वेंटी-२० सामन्यासाठी येथील खेळपट्टी योग्य वाटली. ह्लआम्ही दोन दिवस सराव केरताना विकेट्स आम्हाला संथ वाटत नाहीत. ट्वेंटी-२० सामन्यासाठी विकेट्स चांगल्या आहेत आणि येथे चांगला खेळ होईल.ह्व सूर्यकुमार यादव म्हणाला.
हार्दिक पांड्या हा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. तो मधल्या षटकांमध्ये तो फलंदाजी करताना पहायला मिळेल. रिंकू सिंग हा भारताच्या ट्वेंटी-२० संघातील नियमित खेळाडू आहे आणि त्याच्यावर मॅच फिनिशरची भूमिका बजावण्याची जबाबदारी असेल. वॉशिंग्टन सुंदर आणि रवी बिश्नोई यांचे स्थान पक्के समजले जात आहे. वरुण चक्रवर्थीला पहिल्या ट्वेंटी-२०त संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. तो नोव्हेंबर २०२१मध्ये भारताकडून शेवटचा खेळला होता. जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज यांच्या अनुपस्थिती अर्शदीप सिंग याच्यावर जलदगती माऱ्याची जबाबदारी असेल. त्याच्यासोबतली हर्षित राणा व मयांक यादव यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे.
बांगलादेश टी-२० मालिकेसाठी भारताचा संघ:
सूर्यकुमार यादव (सी), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीप), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या , रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (विकेटकीपर), अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव, टिळक वर्मा